बँकॉक, दि. 19- थायलंडमध्ये खरंतर बहुविवाहावर प्रतिबंध आहे पण तरीही तेथे एका व्यक्तीच्या 120 बायका आणि 28 मुलं आहेत. यामध्ये हैराण करणारी गोष्ट म्हणजे या व्यक्तीच्या प्रत्येक बायकोला एकमेंकीबद्दल माहिती आहे. तसंच त्यांना याबद्दल काहीही हरकत नाहीये. तंबन प्रॅजर्ट नावाची एक व्यक्ती थायलंडच्या नकोन नायोक प्रांताच्या फ्रॉमनी जिल्हाचा प्रमुख आहे. हे ठिकाणी राजधानी बँकॉकपासून जवळपास 90 किलोमीटर लांब आहे. स्थानिक मीडियामध्ये या व्यक्तीच्या संदर्भात बातम्या आल्यानंतर त्याने बेकायदेशीरपणे 100 पेक्षा जास्त लग्न केल्याची कबूली दिली.
58 वर्षीय तंबन प्रॅजर्ट हा स्थानिक नेता एका कस्ट्रक्शन व्यवसायाचा मालकसुद्धा आहे. तंबन यांनी मीडियाला त्यांच्या घरी बोलवून कुटुंबियांसंदर्भातील माहिती दिली. जेव्हा मीडियाने त्यांना त्यांच्या 100 पेक्षा जास्त पत्नी असण्याच्या बातम्यांविषयी प्रश्न विचारला तेव्हा तंबन यांनी म्हंटलं की, इथे माझ्या 120 बायका आणि 28 मुलं-मुली आहेत. मी जेव्हा 17 वर्षाचा होतो तेव्हा माझं पहिलं लग्न झालं होती. माझी बायको माझ्यापेक्षा 2 वर्षाने लहान होती. आम्हाला तीन मुलं झाली. त्यानंतर माझे अनेक महिलांबरोबर संबंध जुळले. यापैकी जास्त मुली तरूणी आहेत.
थायलंडच्या मीडियामध्ये सुरू असलेल्या बातम्यांनुसार तंबनने जेव्हा कस्ट्रक्शन बिझनेस सुरू केला होता तेव्हापासून त्यांना एक वेगळीच सवय लागली होती. तो जेथे घरं बांधायचा, तेथे एका नव्या पत्नीला बरोबर घेऊन जायचा. मी बांधकाम व्यवसायिक आहे. जिथेही घर बांधतो तेथे मला एक पत्नी मिळते. त्या सगळ्यांवर माझ प्रेम आहेच पण त्याही माझ्यावर प्रेम करतात, असं तंबनने सांगितलं.
तंबन जेव्हाही नविन लग्न करतो तेव्हा त्या नव्या लग्नाबद्दल तो आधीच्या सगळ्या पत्नींना सांगत असतो. तंबनच्या 120 पैकी 22 बायका फ्रॉमनीमधील त्याच्या घरापासून जवळपासच राहतात. 'माझ्या 120 पत्नींना या परिस्थितीपासून काहीही अडचण नाही. त्या सगळ्यांनी या परिस्थितीचा स्विकार केला आहे आणि कधी वादही नाही घातला. कुठल्याही मुलीशी लग्न करण्याआधी मी तीच्या कुटुंबियांची पूर्ण सहमती घेऊनच लग्न करतो, असं त्याने सांगितलं आहे. 120 बायका आणि 28 मुलांची देखभाल करणं कठीण नसल्याचंही तंबनने सांगितलं आहे.