तारूण्यानंतर वाढणारं वय कुणालाच आवडत नसतं. भलेही लहान मुलांना वाटत असेल की, त्यांना मोठं व्हायचंय पण जेव्हा लोक मोठे होतात तेव्हा त्यांना वृद्धत्व आवडत नसतं. पुरूषच नाही तर महिलांनाही म्हातारं होणं पसंत नसतं. सगळ्यांनाच वय कमी दिसण्याची इच्छा असते आणि त्यासाठी लोक कितीतरी खर्च करतात. पण एक असाही देश आहे ज्या देशातील महिलांवर वाढत्या वयाचा काही प्रभाव दिसत नाही. चला जाणून घेऊ याचं रहस्य....
(या महिलेचं वय ६३ आहे)
हा देश आहे तायवान. हे एक बेट असून चीन गणराज्याचा भाग आहे. तायवानसोबत एक देशाच्या रूपाने जगातल्या केवळ १७ देशांसोबतच संबंध राहिले आहेत. या देशाची एक वेगळीच संस्कृती असून ती अजूनही टिकून आहे. तायवानची लोकसंख्या साधारण २.३६ कोटी इतकी आहे. तर येथील ७० टक्के लोक हे बौद्ध धर्माचे आहेत.
या देशातील महिला फारच सुंदर असतात आणि जास्त काळ तरूण दिसतात. यामागे त्यांचा आहार आणि मेकअपचं कारण नाहीये. याचं त्यांच्याकडे एक वेगळंच गुपित आहे. या देशात राहणाऱ्या महिला आपल्या रंग-रूपाबाबत फारच काळजी घेतात. यामुळे त्या उन्हाता अजिबातच बाहेर निघत नाहीत. कारण त्यांचं असं मत आहे की, उन्हात गेल्याने रंग काळा आणि खराब होतो.
तायवानच्या लोकांचं मत आहे की, उन्हात गेल्याने त्यांचं आयुष्य घटतं आणि त्यामुळे ते कितीही महत्वाचं काम असलं तरी बाहेर निघत नाहीत. येथील लोकांना खेळांमध्येही फार इंटरेस्ट आहे. कारण येथील लोक चांगलेच फिट आहेत.
येथील लोकांना पावसात भिजण्याची अजिबात आवड नाही. खासकरून महिलांना पावसात भिजण्यापासून खास अॅलर्जी आहे. एका रिसर्चमधून समोर आलं की, येथील लोक फारच मेहनती आहेत. लोक दिवसातील १० तास काम करतात. तसेच कमी वयातच येथील लोक श्रीमंत होतात.
या देशातील शाळा-कॉलेजांमध्ये गणित आणि विज्ञानावर अधिक भर दिला जातो. इथे वाहतुकीसाठी ट्रेन, मेट्रो आणि बस आहेत. पण लोक जास्तीत जास्त स्कूटरचा वापर करतात. तसेच येथील लोक त्यांच्या देशात येणाऱ्या लोकांचं आदारातिथ्य करण्यासाठीही प्रसिद्ध आहेत.