तुम्ही किंवा प्रत्यक्षात पाहिलं असेलच की, मोठमोठे सेलिब्रिटी किंवा उद्योगपती प्रायव्हेट जेटने प्रवास करतात. काही लोक प्रायव्हेट जेट भाड्याने घेतात तर काहींकडे स्वत:चे असतात. प्रायव्हेट विमानाने प्रवास करणारे लोक सामान्य तर नसतातच. अशात या विमानांच्या आत होणाऱ्या गोष्टीही सामान्य नसतात. एका एअर होस्टेसने काही रहस्यांवरून पडदा उठवला आहे की, प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास करणारे लोक काय करतात आणि फ्लाइट अटेंडेंट्सना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, एका फ्लाइट अटेंडेंटने नुकतंच एक्सप्रेस न्यूज वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ती प्रायव्हेट जेट आणि लक्झरी विमानांमध्ये एअर होस्टेस म्हणून काम करते. नावाचा खुलासा न करता एअर होस्टेसने अशा गोष्टी सांगितल्या ज्या लोकांना माहीत नाहीत. तिने सांगितलं की, जे लोक प्रवासासाठी प्रायव्हेट जेट बुक करतात त्यांचं वार्षिक उत्पन्न कोट्यावधी रूपये असतं. कारण लंडनहून ग्लासगोला जाण्यासाठी प्रायव्हेट जेटचं भाडं १३ लाख रूपये आहे.
महिलेने सांगितलं की, बऱ्याचदा फार अजब लोकांसोबत प्रवास करावा लागतो. ती म्हणाली की, एकदा एका यूट्यूबरसोबत ती प्रवास करत होती आणि या गोष्टीने हैराण झाली की, एक यूट्यूबर इतके पैसे कमावू शकतो. त्यासोबत महिलेने सांगितलं की, ती एकदा एक प्रवासी आणि त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत अमेरिकेला जात होती. त्यानंतर ते यूरोपमध्ये पोहोचले जिथे त्या व्यक्तीची दुसरी गर्लफ्रेन्ड आली. महिलेने सांगितलं की, लोक त्यांच्या पार्टनरला प्रायव्हेट जेटमध्ये दगाही देतात. पायलटने आधीपासून महिलेला याची माहिती दिली होती. नाही तर तिने विचारलं असतं की, आधीची मुलगी कुठे गेली.
एअर होस्टेसने आपले अनुभव शेअर करत सांगितलं की, एकदा काही लोक प्रायव्हेट जेटने एका अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी जात होते. अशात त्यांनी दारू सर्व करण्यास सांगितली. महिला हे ऐकून हैराण झाली. कारण तिने हा विचार करून दारू सर्व केली नव्हती की, ते कुणाच्या तरी अंत्यसंस्काराला जात होते. तिने सांगितलं की, अनेकदा त्रास देणारे प्रवासीही असतात जे अजब वागतात. पण कधी कधी लोक प्रायव्हेट जेटमध्ये पार्टी करण्यासाठी किंवा मीटिंग करण्यासाठी येतात तेव्हा चांगले वागतात.