ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने शहीद जवानांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी एक नवीन आयडिया समोर आणली आहे. ती म्हणजे शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करता यावी, यासाठी एक वेबसाईट आणि अॅप बनविण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.
यासंदर्भात मंगळवारी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत त्याने ही आयडिया सर्वांसोबत शेअर केली आहे. यामध्ये तो म्हणाला की, मी २६ जानेवारीसाठी एक नवीन विचार शेअर करतो आहे. आपले सरकार लष्करातील जवान शहीद झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देते. पण आपल्यातील काहीजण त्यांना मदत करू इच्छितात. पण त्यांना याबाबत माहिती नसते की कशी मदत करावी ते. त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहचावे कसे? मी माझ्या परीने शहिदांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहचून मदत करत आहे. जे मदत करु शकतात त्यांना आपणअसे का करु शकत नाही की शहिदांच्या कुटुंबियांची आणि त्यांची एका ठिकाणी भेट घडवू शकेल. यासंबंधी माझ्या मनातून एक आयडिया आली आहे. ही आयडिया एकदम बेकार सुद्धा शकेल किंवा आवडेल सुद्धा. ती म्हणजे एक अशी वेबासाइट किंवा अॅप असायला पाहिजे की शहीद जवानाच्या निकटवर्तीयांचे, वडील, आई किंवा पत्नीचे डिटेल्स यामध्ये असतील. यामार्फत त्यांच्यापर्यंत पोहचता येईल. मदत करता येईल. तसेच, दुसऱ्या दिवशीच त्याच्या अकाउंटच्या डिटेल्स या अॅपवर अपडेट व्हायला हवी. याचबरोबर सरकारला विचारुन यासंबधीची वेबसाइट किंवा अॅप मी स्वत: खर्च करुन विकसित करेन असेही यावेळी अक्षय कुमार म्हणाला. तसेच, त्याने आपल्या या आयडियावर लोकांचे मत सुद्धा मागितले आहे.
Here I am standing up AGAIN for something I truly believe in coz THEIR well-being MATTERS to ME.I'd love to know if it does to YOU as well? pic.twitter.com/3Y5NPmTJhg— Akshay Kumar (@akshaykumar) 24 January 2017