(Image Credit : commons.wikimedia.org)
प्राणी संग्रहालयात तुम्ही अनेकदा पांढरा वाघ, पांढरा भालू असे प्राणी पाहिले असतील, पण तुम्ही कधी पांढरी मगर पाहिली आहे का? तुमचं उत्तर नक्कीच नाही असं असेल. आता पांढऱ्या रंगाची मगर म्हटल्यावर अर्थातच कुणालाही प्रश्न पडू शकतो की, असं कसं? पण अशीच एक मगर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ही पांढरी मगर अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामधील एका प्राणी संग्रहालयात आहे. ही मगर पांढरी असल्याने तिच्यावर खास उपचार सुरू आहे.
या पांढऱ्या मगराची स्वच्छता रोज ब्रशने केली जाते. म्हणजे या मगरीचं मज्जानू लाइफ सुरू आहे. इतर मगरींपासून तिला वेगळं ठेवण्यात आलं आहे. ही मगर सामान्य नैसर्गिक स्थितीत जिवंत राहू शकणार नाही. उन्हात तिची त्वचा जळू लागते. त्यामुळे मगरीला पाण्यातच ठेवलं जातं. ज्या पाण्यात तिला ठेवण्यात आलंय ते पाणी दर काही दिवसांनी बदललं जातं.
या मगरीचं नाव लूना आहे जी अलबिनो नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. याचं वय १४ वर्षे असतं. अशात जगभरात अलबिनोने ग्रस्त मगरी दुर्मीळ मानल्या जातात. शिकागो प्राणीसंग्रहालय सोसायटीनुसार, जगभरात केवळ १०० अलिबिनो मगर आहेत.
हा एक अनोखा जेनेटिक आजार आहे जो कोणत्याही जीव-जंतुना होऊ शकतो. यात शरीराच्या अवयवांसोबत केस, डोळ्यांचे केस, पांढरे होतात. याला रंगहीनताही म्हटलं जातं. या आजाराने ग्रस्त लोक फारच संवेदनशील असतात.