Aliens seen in Large numbers in Britain: जगभरातील लोक एलियन्स बघितल्याचा दावा करतात. काही अशी ठिकाणं आहेत जिथे कथितपणे यूएफओ आणि एलियन्स पुन्हा पुन्हा बघितल्याचा दावा केला जातो. असाच एक दावा ब्रिटीश वैज्ञानिकाने केलाय. ते म्हणाले की, ब्रिटनमध्ये एलियन्स गेल्यावर्षी २५० वेळा आढळून आले.
'द सन' मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये यादरम्यान ज्या लोकांनीही एलियन्स बघितले त्यांना ट्रॉमामधून बाहेर काढण्यासाठी त्यांची काउन्सेलिंग करण्यात आली. ते म्हणाले की, त्यांनी कमी उंचीचे हिरव्या रंगाचे लोक आणि स्पेसशिप पाहिली. ब्रिटीश यूएफओ रिसर्च असोसिएशननुसार, २०२१ मध्ये २५९ वेळा एलियन्स बघण्यात आले.
असोसिएशनचं मत आहे की, लोकांकडून बघण्यात आलेले यूएफओ आणि एलियन्सपैकी ५ टक्के बरोबर होते. त्यांनी सांगितलं की, २०२१ एक खास वर्ष होतं. पण गेल्या काही वर्षात एलियन्स आणि यूएफओ बघण्याची संख्या कमी होती.एका प्रवक्त्याने सांगितलं की, ही घट लोकांना ही जाणीव करून दिल्यावर झाली की, स्पेस एक्स द्वारे लॉन्च करण्यात आलेले स्टारलिंक उपग्रह यूएफओ नव्हते.
ते म्हणाले की, २०१९ दरम्यान मोठ्या प्रमाणात यूएफओ बघण्याच्या मुख्य कारणांपैकी एक होतं स्टारलिंक उपग्रहांचं प्रक्षेपण. लोकांना जसं स्टारलिंक उपग्रहांबाबत समजलं, २०२० दरम्यान यूएफओ बघण्याच्या रिपोर्टची संख्या कमी झाली आणि रेकॉर्ड करण्यात आलेले दृश्य २०१९ मधील संख्येपेक्षा अर्धे झाले.
सेंट एल्बंस, हर्ट्सचे ५६ वर्षीय एलियन प्रशंसक क्रिस बोनहम म्हणाले की, ते एका एलियनला भेटण्यासाठी आतुर आहेत. ते म्हणाले की, मी नेहमीच इतर ग्रहावर जीवन असण्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवला आहे आणि एका एलियनला भेटण्याचं त्यांचं स्वप्न आहे. असं वाटतं की, बघणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. पण ते हार मानणार नाहीत.