मानव अंतरिक्षातील विविध ग्रहांवर जीवसृष्टी असावी काय याचा सातत्याने शोध घेत आहे. तसेच परग्रहवासी सुद्धा पृथ्वीवरील मानव जातीवर नियंत्रण मिळवू पाहत असल्याचे दावे अनेक वर्षे केले जात आहेत. याच विषयात अनेक वर्षे संशोधन करणारे प्रो. डॉ.मायकेल सल्ला यांनी हैराण करणारा दावा केला आहे. डॉ. मायकेल हे क्विन्स्लंड विश्वविद्यालयात कार्यरत असून एलियन्स मानवी राजनीतीवर कसा प्रभाव टाकत आहेत याविषयी त्यांचा अभ्यास आहे. या विषयावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.
मायकेल यांनी एका मुलाखतीत एलियन्सच्या अनेक प्रजाती आहेत आणि त्यातील खतरनाक म्हणावे असे सरीसृप प्रजातीचे एलियन्स पृथ्वीवर कब्जा मिळविण्याच्या प्रयत्नांत आहेत. सरीसृप म्हणजे साप प्रजाती. किंवा सरपटणारे प्राणी प्रजाती. मायकेल या मुलाखतील नवीन थेअरी मांडताना म्हणतात, एलियन्सच्या अनेक प्रजातींपैकी काही प्रजाती मानवाच्या संपर्कात आहेत आणि सरीसृप पृथ्वीवर कब्जा करतील याविषयी वारंवार इशारा देत आहेत. मायकेल यांच्या दाव्यानुसार एलियन्सचे फोटो उपलब्ध आहेत. अनेक एलियन्सला मानव जातीत रस आहे. मायकेल यांनी एलियन्सच्या १७ विविध प्रजाती असल्याचे दावा केला असून त्यातील ६ प्रजातींनी सरकारशी समझोता केला आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
अनेकदा एलियन्स माणसाना चर्चेसाठी उडत्या तबकड्यांच्या आत घेऊन जातात आणि त्यात अनेक सरीसृप एलियन्स आहेत. चांगले एलियन्स हजारो वर्षे पृथ्वीवर राहत आहेत. जेनेटिक इंजिनिअरिंग आणि मानवता विकासात त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे पण सरीसृप एलियन्स मात्र बदमाश आहेत असे मायकेल यांचे म्हणणे आहे.