जगातला सर्वात श्रीमंत व्यक्तीबाबत नेहमीच लोकांमध्ये उत्सुकता असते. त्याच्या सगळ्याच गोष्टी लोकांना जाणून घ्यायच्या असतात. तसंच जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोसबाबत होत. जेफ यांनी नुकतंच अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये १६.६ कोटी डॉलर(१२०० कोटी रूपयांपेक्षा अधिक) आलिशान घर खरेदी केलं.
CNBC च्या वृत्तानुसार, जेफ बेजोसची गर्लफ्रेन्ड लॉरेन सांचेज बऱ्याच दिवसांपासून एका घराच्या शोधात होती. तिने जानेवारीच्या अखेरीस या घराची निवड केली. अमेरिकेतील वृत्तपत्र वॉलस्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, बेजोसने ही प्रॉपर्टी मीडिया उद्योजक डेविड गेफेनकडून खरेदी केली.
(Image Credit : sarkardaily.com)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही लॉस एंजेलिसमध्ये विकल्या गेलेल्या आतापर्यंतच्या सर्वात महागडी संपत्ती आहे. अमेरिकेतील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांची संपत्ती १३ फेब्रुवारीला १३१.३ अब्ज डॉलर इतकी असल्याचं सांगितलं जातं. म्हणून ते सध्याचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
(Image Credit : therealdeal.com)
त्यांनी खरेदी केलेलं हे घर ९ एकर परिसरात पसरलेलं आहे. फोर्ब्स मॅगझिनच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, आर्किटेक्चरल डायजेस्टच्या १९९२ च्या एका स्टोरीमध्ये वार्नर इस्टेटचा उल्लेख आहे. त्यानुसार १३६०० वर्ग फूटाचा हा बंगला जॉर्जिअन स्टाइलमध्ये बांधण्यात आलाय.
(Image Credit : .foxbusiness.com)
यात एक्सपेन्सिव्ह टेरेस आणि गार्डन आहे. त्यासोबच वॉर्नर इस्टेटमध्ये दोन गेस्ट हाऊस, नर्सरी आणि तीन हॅटहाऊस, टेनिस कोर्ट, स्वीमिंग पूल, ९ होल गोल्फ कोर्स, मोटार कोर्ट, सर्व्हिस गॅरेज आणि गॅस पंप आहे.
(Image Credit : fidar.rw)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा लॉस एंजेलिसमध्ये प्रॉपर्टीचा नवीन रेकॉर्ड आहे. या आलिशान बंगल्याचं नाव वॉर्नर इस्टेट आहे. याआधी वॉर्नर ब्रदर्सचे माजी अध्यक्ष जॅक वॉर्नर यांनी हा आलिशान बंगला बांधून घेतला होता.