ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉनवरून शॉपिंग केल्यानंतर अनेकदा अशा घटना घडल्या आहेत की, ग्राहकांनी ऑर्डर दिलेल्या वस्तूंऐवजी दुसऱ्याच वस्तू त्यांच्या घरी पोहोचल्या आहेत.
अशाच प्रकार जोश सॉफ्टवेयरचे सह-संस्थापक आणि संचालक गौतम रेगे यांच्या बाबतीत घडला आहे. गौतम रेगे यांनी अमेझॉनवरून 300 रुपयांच्या स्कीन लोशनची मागणी केली, परंतु त्यांची जागा 19 हजार रुपयांच्या बोस कंपनीचे हेडफोन्स आले आहेत. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
विशेष म्हणजे, अमेझॉनवरून चुकीने आलेले हेडफोन्स परत करण्यासाठी गौतम रेगे यांनी अॅमेझॉन कस्टमर केअरशी संपर्क साधला. मात्र, अमेझॉनने त्यांना ते हेडफोन्स स्वत:कडे ठेवण्यास सांगितले. गौतम रेगे यांना ती वस्तू “नॉन-रिटर्नेबल” आहे, असे उत्तर अमेझॉनचे आले आहे.
दरम्यान, गौतम रेगे यांनी ही माहिती ट्विटरवर पोस्ट केल्यामुळे अनेक जण आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या ट्विटला मजेशीर रिट्विट करत आहेत. ट्विटरवर एका युजर्सने विचारले, "स्कीन लोशन अजूनही स्टॉकमध्ये आहे का? कृपया मला लिंक पाठवा." तर दुसऱ्या युजर्सने म्हटले आहे की, "हॅलो, मला बोस हेडफोनच्या जागी चुकून त्वचेचे लोशन मिळाले. कृपया देवाणघेवाण करा."
गौतम रेगे यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात एका बॉक्समध्ये बोस कंपनीचे वायरलेस हेडफोन्स आहेत. या हेडफोन्सची ऑनलाइन किंमत 19 हजार रुपये होती. दरम्यान, गौतम रेगे यांनी केलेले हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत या ट्विटला 19 हजाराहून अधिक लाइक्स आणि 3 हजार रिट्विट आहेत.