Amelia Earharts Plane Wreckage Found: अमेरिकन महिला वैमानिक अमेलिया इअरहार्टने 87 वर्षांपूर्वी एका छोट्या विमानातून पृथ्वीची प्रदक्षिणा मारण्यासाठी उड्डाण घेतले होते. पण, काही वेळानंतर अचानक तिचे विमान बेपत्ता झाले. अनेक वर्षे शोध घेऊनही तिची काहीच माहिती मिळाली नाही. आता अखेर तिचे विमान सापडले आहे.
अमेरिकन हवाई दलाच्या एका माजी गुप्तचर अधिकाऱ्याने अमेलियाचे विमान सापडल्याचा दावा केला आहे. हे विमान सुमारे 9 दशकांपूर्वी प्रशांत महासागरात बेपत्ता झाले होते. अमेलियाने 1932 मध्ये पृथ्वी प्रदक्षिणा मारण्यासाठी उड्डाण घेतले होते. ती यशस्वी झाली असती, तर हे काम करणारी ती जगातील पहिली महिला पायलट ठरली असती. मात्र अचानक तिचे विमान प्रशांत महासागरात बेपत्ता झाले.
यानंतर पाच-सहा वर्षे अमेलियाचा शोध घेण्यात आला, पण काहीच हाती आले नाही. आता अमेरिकन वायुसेनेचे माजी गुप्तचर अधिकारी टोनी रोमियो यांनी पॅसिफिक महासागराच्या खोल भागात अमेलियाचे विमान सापडल्याचा दावा केला आहे.
विमान 16,400 फूट समुद्रातटोनीची कंपनी डीप सी व्हिजनने समुद्री ड्रोनच्या मदतीने अमेलियाचे विमान सापडल्याचा दावा केला आहे. हे विमान हॉलँड बेटापासून 160 किलोमीटर अंतरावर 16,400 फूट खोलीवर समुद्राच्या पृष्ठभागावर सापडले आहे. हे ठिकाण हवाईयन बेट आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आहे. खोल समुद्रातील ड्रोनने घेतलेली सोनाराची छायाचित्रे थोडी धूसर आहेत. पण चित्रात दिसणारा विमानाचा आकार अमेलियाच्या विमानाशी जुळतो.