फ्लोरिडाच्या लेकलँडमधील एक महिला अचानक करोडपती झाली आहे. तिने 2 मिलियन डॉलर्सचे (16 कोटी 40 लाखांहून अधिक) लॉटरी जिंकली आहे. गेराल्डिन गिम्बलेट असं या महिलेचं नाव असून तिने आपल्या आयुष्यभराच्या कमाईचा वापर हा आपल्या मुलीच्या कॅन्सरवरील उपचारासाठी केला. न्यूयॉर्क पोस्टनुसार, गिम्बलेटची मुलगी ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत होती, परंतु आता गिम्बलेटला आनंद साजरा करण्याची संधी मिळाली आहे, कारण मुलीचे उपचार देखील पूर्ण झाले आहेत आणि लॉटरी जिंकून महिलेला भरपूर पैसे देखील मिळाले आहेत.
फ्लोरिडा लॉटरीच्या प्रेस रिलीझनुसार, गिम्बलेटने तिच्या मुलीने कॅन्सरच्या उपचाराची शेवटची फेरी पूर्ण केल्याच्या दुसऱ्या दिवशी लेकलँडमधील गॅस स्टेशनवर 2 मिलियन डॉलर लॉटरीचे तिकीट खरेदी केले. गॅस स्टेशनच्या क्लार्कने सांगितले की, कोणतीही तिकिटे शिल्लक नाहीत, परंतु महिलेने त्यांना पुन्हा शोधण्यास सांगितले कारण तिला क्रॉसवर्ड गेम सर्वात जास्त आवडला. तिला शेवटचे तिकीट मिळाले. गिम्बलेटला लवकरच कळले की, तिने गेमचे सर्वोच्च पारितोषिक जिंकले आहे.
गिम्बलेटचे संपूर्ण कुटुंब तल्लाहसी येथील फ्लोरिडा लॉटरी मुख्यालयात पोहोचले. फ्लोरिडा लॉटरीने ही पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे. गिम्बलेटच्या मुलीने सांगितले की 'तिच्या आईने आजारी असताना त्याची काळजी घेण्यासाठी तिच्या आयुष्यभराची कमाई संपवली होती. ज्या दिवशी माझ्या आईने हे तिकीट विकत घेतले, त्या दिवशी मी दारावरची बेल वाजवली आणि कॅन्सरवरील उपचार पूर्ण करून हॉस्पिटलमधून बाहेर पडले. मी माझ्या आईसाठी खूप आनंदी आहे.
ट्विटरवर युजर्स यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, या कुटुंबासाठी खूप आनंद झाला आहे, देव पुढे आला आणि आई-वडिलांना आपल्या मुलांना वाचवण्यासाठी मदत केली. दुसऱ्याने लिहिले, अभिनंदन !!!! तुम्ही निःस्वार्थपणे दिलं आणि त्या बदल्यात तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळाले. देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देवो. हा एक सुंदर चमत्कार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"