आरोपींना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळते, पण एका व्यक्तीने तब्बल 17 वर्षे न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगली. ही घटना अमेरिकेत घडली असून, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्या व्यक्तीला नुकसान भरपाई म्हणून 8 कोटी रुपये देण्यात आले. 17 वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्ह्यातील आरोपीचा आणि या व्यक्तीचा चेहरा सारखाच असल्यामुळे पोलिसांनी या व्यक्तीला पकडलं होतं.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, 45 वर्षीय रिचर्ड जोन्स यांना 2000 मध्ये एका दरोड्याच्या प्रकरणात तुरुंगात टाकण्यात आलं होतं. पण, हा दरोडा रिचर्डनं नाही, तर त्याच्यासारख्या दिलणाऱ्या व्यक्तीने केला होता. रिचर्डला आयुष्यातील एक तृतीयांश भाग तुरुंगात घालवा लागला. त्या घटनेतील पीडितांना आणि साक्षीदारांना खऱ्या आरोपीचा फोटो दाखवण्यात आल्यावर हे प्रकरण उघडकीस आलं. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. निरपराध रिचर्डने आयुष्यातील मोठा काळ तुरुंगात घालवला होता.
गुन्हा कुणी केला?
1999 मध्ये रिकी अमोस नावाच्या व्यक्तीने दरोडा टाकला होता. त्याचा चेहरा रिचर्डसारखा दिसत होता, त्यामुळे खऱ्या गुन्हेगाराला ओळखण्यात पोलिसांची चूक झाली. रिचर्डने सांगितलं की, घटनेच्या वेळी तो त्याच्या मैत्रिणीसोबत इतर ठिकाणी होता. पण पुराव्याअभावी त्याला दोषी ठरवण्यात आलं. प्रत्यक्षदर्शींनीही रिचर्डला ओळखण्यात चूक केली आणि त्यालाच दरोडेखोर समजले. तुरुंगात गेल्यानंतर रिचर्डने अनेकवेळा अपील केले, पण तो स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकला नाही.
सत्य असे समोर आलेमिडवेस्ट इनोसेन्स प्रोजेक्ट आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅन्सस स्कूल ऑफ लॉ यांनी रिचर्डच्या प्रकरणाची चौकशी केली. त्यांच्या तपासातून असे आढळून आले की, रिचर्डसारखा दिसणारा रिकीदेखील त्याच तुरुंगात कैद आहे. त्याला दुसऱ्या एका प्रकरणात कैद झाली आहे. हे समजल्यानंतर, प्रत्यक्षदर्शींसमोर रिकी आणि आरोपी आमोस यांना आणले. दोघे इतके हुबेहूब दिसत होते की, लोकही चकित झाले. अशा प्रकारे रिचर्डची सुटका झाली आणि त्याला निर्दोष घोषित करण्यात आलं. 2017 मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर रिचर्डला भरपाई म्हणून 8 कोटी रुपये देण्यात आले होते.