Mike Schultz नावाच्या या व्यक्तीचं वय 43 वर्षे आहे. तो सॅन फ्रान्सिस्कोमध्ये नर्सची नोकरी करतो. त्याच्यासारखे असे अनेक लोक आहेत जे विचार करतात की, ते फिट आहेत आणि व्हायरस त्यांचं काही बिघडवू शकणार नाही. पण हा विचारच चुकीचा आहे. कारण माइकला कोरोनाने शिकार केलं आणि त्याची तब्येत पार बदलून गेली. कोरोना मनुष्याची हालत काय करतो हे त्याच्याकडे पाहून दिसून येतं.
माइक साउथ मियामी बीचवर विंटर पार्टी फेस्टीव्हलमध्ये भाग घेण्यासाठी गेला होता. तो त्या 38 लोकांपैकी आहे ज्यांना तिथे कोरोनाची लागण झाली होती. या फेस्टिव्हलमध्ये 10 हजारपेक्षा जास्त लोकांनी हजेरी लावली होती.
माइकने त्याचा एक मर्ज केलेला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात त्याला कोरोनाची लागण होण्याआधीचा आणि लागण झाल्यानंतरचा फोटो आहे. फोटोत तुम्ही बघू शकता की, कोरोनाने त्याला किती कमजोर केलंय.
माइकने सहा आठवडे कोरोनासोबत लढा दिला. या सहा आठवड्यात त्याचं वजन फारच कमी झालं.त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्याने लिहिले की, 'कोविड 19 ची लागण झाल्यावर माझ्या फुप्फुसांची क्षमता फार कमी झाली. मी माझ्या घरापासून 8 आठवड्यांपासून दूर आहे. मी माझ्या फुप्फुसांच्या क्षमतेवर काम करत आहे. मी पुन्हा फिट होणार आहे'.
पोस्टमध्ये त्याने लिहिले की, कोरोनामुळे त्याची स्थिती इतकी वाईट झाली होती की, तो मोबाइल सुद्धा व्यवस्थित पकडू शकत नव्हता. तो फार कमजोर झाला होता. हा काळ फारच वाईट होता. मला टाईपही करता येत नव्हतं. माझे हात कोरडे झाले होते'. सध्या माइक रिकव्हर करत आहे.