कुणाचं नशीब कधी आणि कसं चमकेल हे काहीच सांगता येत नाही. एका कपलसोबतही असंच काहीसं झालं. न्यूयॉर्कमधील ही घटना चर्चेचा विषय ठरत आहे. एक अमेरिकन कपल तलावात मासे पकडण्यासाठी गेलं होतं. यावेळी त्यांच्या मासे पकडण्याच्या काट्यामध्ये अशी वस्तू अडकली की ते रातोरात श्रीमंत झाले. त्यांना असं काही सापडलं ज्याचा त्यांनी कधी विचारही केला नसेल.
द गार्जियनच्या रिपोर्टनुसार, कपलने मासे पकडण्यासाठी चुंबक असलेला काटा पाण्यात फेकला. काही वेळाने काही जड त्यात अडकल्याचं जाणवलं. जसा त्यांनी काटा वर खेचला त्यांना त्या काट्याला एक लोखंडी तिजोरी अकडली होती. जेव्हा त्यांनी ही तिजोरी बाहेर काढली आणि उघडून पाहिली तर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्याना आत प्लास्टिकच्या पिशवीत नोटांचे बंडल सापडले. असं सांगण्यात आलं की, ही रक्कम १००,००० डॉलर म्हणजे ८३ लाख रुपये होते.
याबाबत कपलने सांगितलं की, याआधीही या तलावात काही तिजोरी सापडल्या आहेत. पण त्या तिजोरी रिकाम्या होत्या. त्यांना वाटलं की, ही तिजोरी सुद्धा रिकामी असेल. पण जेव्हा त्यांनी ती उघडली तेव्हा त्यांचं नशीब चमकलं.
ही रक्कम सापडल्यानंतर कपलने न्यूयॉर्क पोलिसांना संपर्क केला. ज्यानंतर पोलिसांनी कपलला सापडलेली सगळी रक्कम ठेवून घेण्यास सांगितलं. तेच पोलिसांनी यावर सांगितलं की, चोराने कुठूनतरी ही तिजोरी चोरी केली असेल, पण पकडल्या जाण्याच्या भितीने त्याने ती फेकली असेल.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, आतापर्यंत जेम्स केन आणि बार्बी एगोस्टिनी नावाच्या या कपलला ब्रुकलिनमध्ये द्वितीय महायुद्धावेळचा एक ग्रेनेड सापडला आणि काही बंदुकी सापडल्या. असं सांगण्यात आलं की, यातील काही बंदुकी 19व्या शतकातील आहेत. असंही सांगण्यात आलं की, लॉकडाऊन दरम्यान कंटाळा येऊ नये म्हणून कपलने चुंबकाच्या मदतीने मासे पकडणं सुरू केलं होतं. पण त्यांना हे नव्हतं माहीत की, त्यांना नदी आणि तलावांमध्ये अशा वस्तूही सापडतील.