शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
3
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
4
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
5
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
6
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
7
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
8
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
9
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
10
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने शरद पवार गटात नाराजी? इंदापूरच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार बदलण्याची केली मागणी
11
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
12
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
13
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
14
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
15
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
16
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
17
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
18
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा
19
Nobel Peace Prize 2024: अण्वस्त्रांविरोधात काम करणाऱ्या संस्थेचा नोबेल शांतता पारितोषिकाने सन्मान
20
Manu Bhaker चा फॅशन वीकमध्ये जलवा; ऑलिम्पिक मेडलिस्ट खेळाडूचा नवा अवतार

हॅलिपॅड ते स्वीमिंग पूल...'ही' आहे जगातील सर्वात लांब कार, आहे 'इतकी' फूट लांब

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 7:25 PM

या कारची लांबी १०० फूट आहे. २६-व्हील ड्राइव्ह कारला स्विमिंग पूल आणि हेलिपॅडदेखील आहे. अमेरिकन ड्रीम कारचे नाव यापूर्वीच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Records) नोंदवले गेले आहे. पण आता त्यांनी आपलाच जुना रेकॉर्ड मोडला आहे.

कार किंवा आपल्या घरगुती एखाद्या वाहनात साधारणपणे ४-५ लोक आरामात बसू शकतात. पण तुम्ही असे वाहन पाहिले आहे, का ज्याच्या आत स्विमिंग पूल आहे, छतावर हेलिपॅड आहे. एवढेच नाही तर डझनभर लोकांना बसण्यासाठी जागा असावी. तुमचे उत्तर बहुधा नाही, असे असेल. चला तर, आम्ही तुम्हाला अशा कारबद्दल सांगतो ज्यामध्ये हे सर्व फीचर्स आहेत. आम्ही अमेरिकन ड्रीम कार (American dream car) नावाच्या कारबद्दल बोलत आहोत. जगातील सर्वात लांब (Longest) कारच्या यादीत या कारचा समावेश करण्यात आला आहे. या कारची लांबी १०० फूट आहे. २६-व्हील ड्राइव्ह कारला स्विमिंग पूल आणि हेलिपॅडदेखील आहे. अमेरिकन ड्रीम कारचे नाव यापूर्वीच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Records) नोंदवले गेले आहे. पण आता त्यांनी आपलाच जुना रेकॉर्ड मोडला आहे.

या कारची लांबी ६० फूटांवरून १०० फूट करण्यात आली आहे. ही कारही १.५ इंच रुंद आहे. या कारमध्ये एकूण २६ चाके आहेत. या कारमध्ये एकावेळी एकूण ७५ लोक बसू शकतात, असे सांगण्यात येत आहे. द अमेरिकन ड्रीम १९८६ मध्ये कॅलिफोर्निया, यूएसए येथील कार कस्टमायझर जे ओहरबर्ग यांनी तयार केले होते, डेली स्टारनुसार, त्याची लांबी ६० फूट होती. नंतर विश्वविक्रम करण्यासाठी त्यांनी ती १०० फुटांपर्यंत वाढवली. अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्येही ही कार दाखवण्यात आली होती.

एक काळ असा होता, की ही कार पूर्णपणे भग्नावस्थेसमान होती, परंतु नंतर एका संग्रहालयाचे मालक असलेल्या मायकेल मॅनिंग नावाच्या व्यक्तीने तिचा पुनर्विकास केला. ही कार रिस्टोअर करण्यासाठी त्यांनी खूप पैसा खर्च केला. ते नंतर फ्लोरिडाच्या डेझरलँड पार्क कार म्युझियमचे मालक मायकेल डेझर यांनी विकत घेतले आणि तिला भेट देण्यालायक बनवले.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके