अमेरिकेत एक तरूणी समुद्र किनारी सनबाथ घेत होती. पण तिचा हा अंदाज तिथे असलेल्या एका मध्यम वयाच्या महिलेला आवडला नाही. सेवेना सिम्स नावाच्या या महिलेने सांगितले की, तिच्यावर इतका दबाव टाकण्यात आला की, तिला ते ठिकाण सोडावं लागलं. त्यानंतर या महिलेने तिच्यासोबत घडलेली घटना व्हिडीओतून सर्वांना सांगितली.
सिम्स हवाईतील लोकप्रिय पब्लिक बीचवर सनबाथ घेत होती. इतक्यात एक महिला तिच्या मुलांसोबत आणि बॉयफ्रेन्डसोबत तिथे आली आणि सिम्सच्या बाजूला शिफ्ट झाली. ती सतत सिम्सकडे बघत होती. ज्यामुळे सिम्सलाही विचित्र वाटत होतं. त्यानंतर ती महिला हळू आवाजात आपल्या बॉयफ्रेन्डसोबत बोलू लागली होती.
सिम्सने आपल्या व्हिडीओत सांगितले की, महिला सतत आपल्या बॉयफ्रेन्डला म्हणत होती की, तिला माझी बिकीनी आवडली नाही. त्यानंतर मी या महिलेकडे पाहिलं आणि तिला विचारलं की, तिला काही अडचण आहे का? यावर ती महिला म्हणाली की, ती माझी बिकीनी बघून खूश नाही आणि तिला वाटतं की, मी इथून निघून जावं.
सिम्स म्हणाली की, मला कोणत्याही प्रकारचा वाद करायचा नव्हता. त्यामुळे मी माझं ठिकाण बदललं. पण मला फार वाईट वाटत होतं आणि मला त्या महिलेमुळे अपमानित झाल्यासारखं वाटत होतं. हा माझ्या लाइफमधील सर्वात वाईट दिवसांपैकी एक दिवस होता. कुणालाही इतरांच्या कपड्यांववरून टिका करण्याचा अधिकार नाही.
या महिलेच्या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक लोकांनी सिम्सला सपोर्ट केलाय आणि म्हणाले की, समुद्र किनारी सनबाथ घेण्यासाठी महिला बुर्का घालून नाही जाऊ शकत. तर काही लोकांनी त्या दुसऱ्या महिलेला सपोर्ट केला. लोक म्हणाले की, सिम्सने दुसरी बिकीनी घालायची असती.