जेव्हा आकाशातून एखादं विमान जातं तेव्हा ते पाहण्यासाठी लहान मुलं घराबाहेर पडतात. विमान हे आपल्या देशातील अनेकांसाठी खास वाहन आहे. देशात लोकसंख्येचा मोठा भाग असा आहे, जो आजपर्यंत कधीही विमानातही बसला नाही. पण जगात एक असं ठिकाण आहे जिथे विमानाने प्रवास करणे इतके सामान्य आहे की लोकांचे स्वतःचे विमान आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण जगातील एका गावात बहुतेक लोकांकडे विमान आहे. येथे लोक त्यांचे दैनंदिन काम विमानातूनच करतात आणि विमाने घराबाहेर गाड्यांसारखी उभी असतात.
स्प्रूस क्रीक हे फ्लोरिडा असं या गावाचं नाव आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथे सुमारे 5,000 लोक राहतात आणि 1,300 घरे आहेत. या गावात सुमारे 700 घरांमध्ये हँगर आहेत. विमान जेथे उभे असते त्या जागेला हँगर म्हणतात. येथे गाड्यांसाठी गॅरेज बनवण्याऐवजी लोक त्यांच्या घरात हँगर बनवतात आणि त्यांची विमाने तिथे उभी असतात. विमान टेक ऑफ करण्यासाठी गावापासून हाकेच्या अंतरावर रनवे आहे.
लोक नाश्ता करण्यासाठी विमानाने जातात
गावात राहणारे बहुतेक लोक प्रोफेशनल पायलट आहेत. म्हणूनच विमान असणे सामान्य गोष्ट आहे. याशिवाय गावात डॉक्टर, वकील आदी आहेत. या लोकांना विमान ठेवण्याचाही शौक असतो. इथल्या लोकांना विमानाची इतकी आवड आहे की दर शनिवारी सकाळी ते रनवेवर जमतात आणि स्थानिक विमानतळावर जाऊन नाश्ता करतात. याला Saturday Morning Gaggle म्हणतात.
स्प्रूस क्रीक हे अमेरिकेतील एकमेव ठिकाण नाही जिथे विमान असणे सामान्य आहे. अमेरिकेतील एरिझोना, कोलोराडो, फ्लोरिडा, टेक्सास, वॉशिंग्टन आणि कॅलिफोर्नियामध्ये अशी अनेक गावे किंवा समुदाय आहेत, जिथे लोकांची स्वतःची विमाने आहेत. येथे 600 हून अधिक फ्लाय-इन समुदाय आहेत, त्यापैकी स्प्रूस क्रीक हा सर्वात मोठा फ्लाय-इन समुदाय आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"