एका बाजूला कोरोनाचे संकट सर्वत्र पसरलेले असताना माणुसकीचे दर्शन घडवणारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका पोलिस अधिकाऱ्यानचे काही फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंनी लोकांचं मन जिंकलं आहे. सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. या फोटोवर असं कॅप्शन लिहिलं आहे की धर्माच्या नावावर हिंसा पसरवत असलेल्या लोकांसाठी हा फोटो खूप काही शिकवणारा आणि चपराक मारणारा आहे.
या फोटोमध्ये पोलीसासोबत एक लहान मुलगा आहे. हा मुलगा त्याच्या ड्रेसिंगवरून मुसलमान असल्याच दिसून येतं. या पोलीस अधिकाऱ्याचं नाव महंतेश बनप्पागौदर आहे. कर्नाटक मधील पोलिसाचा हा फोटो आहे. महंतेशने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
पोलिसाने या लहान मुलाला रस्त्यावर जाताना पाहिलं आणि विचारलं, तुला मोठं होऊन काय बनायला आवडेल? तेव्हा त्या मुलाने पोलीस व्हायला आवडेल असं उत्तर दिलं. त्यानतंर या पोलिसाने जे केलं ते पाहून तुमचा विश्वास बसणार नाही.
या पोलीस अधिकाऱ्याने आपली कॅप काढून त्या मुलाला घातली आहे. नंतर त्या चिमुरड्याला मिठी मारली . महंतेशने सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट केल्यानंतर धर्माच्या आणि संप्रदायाच्या नावावर सामाजिक हिंसा पसरवत असलेल्या लोकांना पाहून मला खूप दुःख होतं, असं म्हटलं आहे. लोकांनी या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पोलीस अधिकारी असावा तर असा अशी कमेंट केली आहे.