एका ११ वर्षाच्या मुलाची कल्पना करा, ज्याच्या वडिलांची सावली त्याच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलंय आणि त्याच्या १७ वर्षांच्या मोठ्या भावासह संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली आहे. ही कथा तुम्हाला एखाद्या चित्रपटाची वाटेल, पण ही अमृतसरमधील दोन भावांची गोष्ट आहे. त्यांचा प्रवास ऐकून आनंद महिंद्रा यांनादेखील वाइट वाटलं. आनंद महिंद्रा (Anand Mahindra Tweet) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.
हा व्हिडीओ अमृतसह वर्किंग टूर्स (Amritsar Walking Tours) नावाच्या एका YouTube चॅनलचा आहे. या व्हिडीओमध्ये १७ वर्षांचा जशनदीप आणि ११ वर्षांच्या अंशदीप सिंग यांची गोष्ट आहे. ते दोघं अमृतसरमध्ये Top Grill नावाचं एक हॉटेल चालवतात. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या वडिलांनी हे हॉटेल सुरू केलं होतं. परंतु २६ डिसेंबर रोजी त्यांचं निधन झालं. परंतु आता हे दोन्ही भाऊ एकत्र मिळून हे हॉटेल चालवतात. त्यांच्यासाठी या जागेचं भाडंही देणं कठीण होत आहे.