तुम्ही अशा अनेक कथा ऐकल्या असतील ज्यामध्ये माणसाला दगड बनवलं जातं. काही कथांमध्ये दगड होण्याचा शाप दिला जातो. इटलीमध्ये एक असं ठिकाण आहे. ज्या ठिकाणी माणसचं नाही तर प्राणीसुद्धा दगड बनले होते. त्याठिकाणी आज सुद्धा काही माणसासारखी आणि प्राण्यांप्रमाणे असलेली दगडं पहायला मिळतील. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे.
इटलीतील या शहराचं नाव पोम्पई आहे. १९४० वर्षांपूर्वी हे शहर सुंदर होतं. त्या ठिकाणी एकदा अशी घटना घडली. त्या घटनेने सगळ्यांची झोप उडवली. एका रात्रीत संपूर्ण गाव उध्वस्त झालं. त्या ठिकाणचे खूप कमी असे पुरावे आहेत. ज्या आधारे माणसं वाचली असतील असं सांगितलं जातं.
पोम्पई हे शहर जवळपास १७० एकरात पसरलं आहे. या ठिकाणी असलेले खंडर आणि अवशेषांवरून दिसून आलं की जवळपास ११ हजार ते १५ हजार लोक या ठिकाणी राहत असतील. काही वर्षापूर्वी पुरातत्व विभागाच्या माणसांना या ठिकाणी घोड्यांचं शरीर आणि कवच मिळालं होतं. याव्यतिरिक्त एक मानवी डोक्याचा भाग सुद्धा सापडला होता.
पोम्पईमधिल खाडीत एक ज्वालामुखी आहे. ज्याच नाव वसुवीयस आहे. हा ज्वालामुखी फाटल्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणावर ज्वाला आणि गॅस तसंच राख बाहेर पडत होती. या शहरातील लोक शहर सोडून पळणार तोपर्यंत ज्वालामुखीचा सुद्ध उद्रेक झाला होता. त्यामुळे लोकांच्या शरीरातील तापमान वाढून शरीरातील काही भाग फाटत होते. लाव्हा फुटल्यामुळे लोकांचा मृत्यू झाला . ज्वालामुखी थंड होईपर्यंत माणसांचे दगड झाले होते.
पोम्पोईच्या ज्वालामुखीने अजून एका शहराला उध्वस्त केलं होतं. त्या शहराचं नाव हर्कुलेनियम होतं. त्यावेळी आपला जीव वाचवण्याासाठी ३०० लोक बोटहाऊसमध्ये घुसले होते. पण तापमान वाढल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.