Ancient coins found: सार्डिनियापासून काही अंतरावर समुद्रात वस्तू शोधणाऱ्या एका व्यक्तीला खोल पाण्यात प्राचीन नाण्यांचा खजिना सापडला आहे. जो बघून तो अवाक् झाला. ही नाणी ब्रॉन्ज मेटलपासून बनलेली आहेत. ज्या व्यक्तीला ही नाणी सापडली आहेत त्याची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.
Independent च्या रिपोर्टनुसार, या व्यक्तीला सार्डिनिया समुद्र किनाऱ्याच्या काही अंतरावर धातुची एक वस्तू दिसली. त्याने आणखी बारकाईने पाहिलं तर त्याला हजारो प्राचीन बॉन्ज नाणी दिसली. इटलीच्या सांस्कृतीक मंत्रालयाने सांगितलं की, या व्यक्तीने नाण्यांबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली. काही लोकांना पाठवून ही नाणी बाहेर काढण्यात आली.
या व्यक्तीला सापडलेली नाणी फार जुनी आहेत. ही नाणी चौथ्या शतकातील असल्याचं सांगितलं जात आहे. ही नाणी या व्यक्तीला भूमध्यसागराच्या द्वीपाच्या उत्तरपूर्व तटापासून काही अंतरावर समुद्राच्या तळाशी सापडली.
मुळात किती नाणी सापडली हे अजून ठोसपणे सांगण्यात आलं नाही. त्यांची स्वच्छता आणि मोजणी सुरू आहे. मिनिस्ट्रीतून सांगण्यात आलं की, नाण्यांचं एकूण वजन पाहता ती 30 ते 50 नाणी असावीत. सगळीच नाणी सुस्थितीत होती. काही नाणी डॅमेज झाली होती.