जगभरातील लोक वेगवेगळे रेकॉर्ड कायम करत असतात. यातील काही आश्चर्यकारक तर काही विचित्र असतात. बेल्जिअमच्या ४८ वर्षीय व्यक्तीने टॉयलेट सीटवर ११६ तास बसून राहण्याचा विचित्र रेकॉर्ड कायम केला आहे. जिमी द फ्रेनी असं या व्यक्तीचं नाव असून एका पबमध्ये त्याला स्पेशल टॉयलेट सीट उपलब्ध करून देण्यात आली होती.
जिमी द फ्रेनी याला दर एका तासाने ५ मिनिटांचा ब्रेक दिला जात होता. या ब्रेकमध्ये तो त्याची कामे करायचा. तसेच त्याला टॉयलेटला जाण्यासाठीही ब्रेक हवा होता. कारण तो ज्या टॉयलेट सीटवर बसलेला होता, ती वॉटर सिस्टीमसोबत कनेक्ट केलेली नव्हती. जिमीने ने एका वृत्त संस्थेला सांगितले की, 'स्वत:ची गंमत करण्यात एक वेगळीच मजा आहे. मी हे का करतोय? असा प्रश्न पडला नाही. लोक माज्यावर हसतील यापेक्षा दुसरी गंमत नाही. कारण नंतर मी त्यांच्यावर हसू शकेन'.
खरंतर टॉयलेटच्या हार्ड सीटवर इतका वेळ बसून राहणे हे सोपं काम नाही. जिमीचे पाय ५० तासांनी दुखायला लागले होते. पण त्याने वेदना सहन केल्या आणि ११६ तास टॉयलेट सीटवर बसून राहण्याचा एक नवा रेकॉर्ड कायम केला.
अधिकृत रेकॉर्डच नोंदवला नाहीये.रिपोर्टनुसार, टॉयलेट सीटवर इतका वेळ कुणी बसून राहण्याचा अधिकृत रेकॉर्ड कुणीच नोंदवला नाहीये. तर जिमी म्हणाला की, त्याला १०० तास खाली बसून राहिलेली एक व्यक्ती भेटली होती. तसेच तो म्हणाला की, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सला मी केलेल्या रेकॉर्डची कल्पना आहे आणि स्थानिक अधिकारी या रेकॉर्ड अधिकृत नोंदणी करता येईल का याची चाचपणी करत आहेत.
दरम्यान, पब्समध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करणं ही काही नवीन बाब नाही. ब्रूस मास्टर नावाच्या व्यक्तीने यूकेतील ५१ हजार ६९५ पब्सना भेट देण्याचा अनोख रेकॉर्ड कायम केला आहे. हा रेकॉर्ड त्यांनी ५० वर्षात केला. ब्रूसचा पबचा पहिला अनुभव हा तो १५ वर्षांचा असताना घेता आला होता. तसेच त्याने ५० वर्षात १ लाख २० हजार डॉलर अल्कोहोलवर खर्च केल्याचंही सांगितलं.