(प्रातिनिधिक छायाचित्र)
आंध्र प्रदेशातील विजयनगरममध्ये एका रेल्वेच्या लोको पायलटने आपला जीव धोक्यात घालून रेल्वेखाली येऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरूणाचा जीव वाचवला. लोको पायलटने वेळीच इमरजन्सी ब्रेकचा वापर केला आणि तिकडे तरूण रेल्वेखाली येतायेता वाचला.
ही घटना आहे विजयनगरमच्या कोरूकोंडा येथील. येथील रेल्वे चालक काही रिकाम्या बोगी घेऊन विशाखापट्टनमहून विजयनगरमकडे जात होता. तेव्हाच त्याने काही अंतराहून पाहिले की, एक तरूण रेल्वे पटरीवर लेटलेला आहे. या दरम्यान रेल्वे आणि पटरी लेटलेल्या तरूणात जास्त अंतर नव्हतं.
लोको पायलटने हॉर्न वाजवून तरूणाला सूचना देण्याचा प्रयत्नही केला. पण तरूणावर याचा काहीही परिणाम झाला नाही. रेल्वेचा स्पीडही बराच होता. आता कोणताही पर्याय दिसत नसल्याने लोको पायलटने जराही वेळ न घालवता इमरजन्सी ब्रेक लावला.
रेल्वे स्पीडमध्ये असल्याने आणि इमरजन्सी ब्रेक लावल्याने रेल्वेला जोराचा झटका बसला आणि मोठा आवाज झाला. रेल्वे पटरीवरून घसरत तरूणाच्या काही मीटरपर्यंत जाऊन पोहोचली. इकडे रेल्वेचा स्पीड कमी होताच लोको पायलटने इंजिनमधून उडी घेतली आणि तरूणाचा जीव वाचवला.
लोको पायलटने या घटनेची माहिती जवळच्या स्टेशन मास्टरला आणि रेल्वे अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. स्टेशन मास्तरने आत्महत्या करण्यासाठी पटरीवर आलेल्या तरूणाला समजावून सांगितले. रेल्वे अधिकाऱ्यांनी तरूणाला त्याच्या परिवाराकडे सोपवलंय. स्थानिक पोलीस याबाबत चौकशी करत आहेत.