सोशल मीडियावर एका आदर्श शिक्षकाच्या निरोप समारंभाचा (Teacher Farewell) व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका गावातील सरकारी शाळेतील शिक्षकाची बदली झाली, त्यावेळी त्या गावातील लोकांनी मोठ्या आनंदाने या शिक्षकाला निरोप दिला.
यावेळी गावातील लोकांनी या शिक्षकाचे पाय धुतले, खांद्यावर घेऊन नाचत परंपरेप्रमाणे निरोप दिला. (Village Residents Giving Warm Send Off To Govt School Teacher) हा निरोपाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ आयएएस अधिकारी डॉ. एम व्ही राव (IAS Officer Dr. M V Rao, IAS) यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) विजयनगरम (Vijayanagaram) जिल्ह्यातील गुम्मा लक्ष्मीपुरम (Gumma Lakshmipuram) गावात मल्लूगुडा सरकारी शाळेतील शिक्षक नरेंद्र गोवडू (Narender Gowdu) यांची बदली झाली. त्यानंतर या गावातील लोकांनी शिक्षक नरेंद्र गोवडू यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात केला. निरोप समारंभादिवशी गावातील लोकांनी नरेंद्र गोवडू यांचे आपले पाय धुतले, त्यांना खांद्यावर बसून पारंपारिक नृत्य केले.
दरम्यान, या शिक्षकाचा निरोप समारंभ पाहून आयएएस अधिकारी डॉ. एम व्ही राव यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. व्हिडिओ शेअर करताना त्यानी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'सोशल मीडियावर इंटरेस्टिंग व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. आदिवासी ग्रामस्थांनी शिक्षकाला शानदार निरोप दिला. ज्यावेळी त्यांची दुसर्या ठिकाणी बदली झाली'.
हा व्हिडिओ आयएएस अधिकारी डॉ. एम व्ही राव यांनी २ फेब्रुवारीला संध्याकाळी ट्विटरवर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ आतापर्यंत ६ हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर या व्हिडीओला ६०० हून अधिक लाईक्स मिळाले असून अनेकांनी री-ट्वीट केला आहे. बऱ्याच लोकांनी या व्हिडीओ पाहून निरोप समारंभ अविस्मरणीय असल्याची भावना व्यक्त केली आहे.