शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

भारतातील एक असं गाव जिथे चप्पल-शूज घालत नाही लोक, हॉस्पिटलमध्येही जात नाहीत; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 5:37 PM

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या लोकांना कुठे दूर जायचं असेल तरीही ते चपप्ल घालत नाहीत. हे गाव देशातील इतर गावांपेक्षा फार वेगळं आहे. या गावाचं नाव आहे वेमना इंदलू.

आजच्या काळात चप्पल आणि हॉस्पिटलशिवाय कुणीही दूर राहू शकत नाही. पण भारतात आजही एक गाव असं आहे जेथील लोक ना चप्पल घालत ना कधी हॉस्पिटलमध्ये जात. हैराण करणारी बाब म्हणजे या गावात एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला किंवा खासदार-आमदाराला यायचं असेल तर त्यांनाही चप्पल गावाबाहेर काढावी लागते. तेच या गावातील लोक गावात असो वा गावाबाहेर ते विना चप्पलच असतात.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या लोकांना कुठे दूर जायचं असेल तरीही ते चपप्ल घालत नाहीत. हे गाव देशातील इतर गावांपेक्षा फार वेगळं आहे. या गावाचं नाव आहे वेमना इंदलू.  आंध्र प्रदेशच्या तिरूपतीपासून हे गाव 50 किलोमीटर दूर आहे. एका रिपोर्टनुसार, या गावाच्या सरपंचांनी सांगितलं की, जेव्हापासून हे लोक गावात वसले, तेव्हापासून ही परंपरा आहे की, गावात जर कुणी आलं तर आंघोळ केल्याशिवाय येऊ नये. 

तिरूपती जिल्ह्याच्या पाटला मंडलच्या या छोट्याशा गावात 25 परिवार राहतात. गावातील एकूण लोकसंख्या 80 आहे. जास्तीत जास्त लोक शिकलेले नाहीत आणि शेतीवर अवलंबून आहेत. गावातील नियमांचं पालन गावातील लोकांच्या नातेवाईकांना देखील करावं लागतं. रिपोर्टनुसार, स्वत:ला पलवेकरी जातीचे सांगतात. 

गावातील लोक भगवान वेंकटेश्वरची पूजा करण्यासाठी तिरूमाला इथेही जात नाही. ते गावातच त्यांची पूजा करतात. गावातील लोक म्हणतात की, ते कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जात नाही. कारण त्यांना विश्वास आहे की, देवच सगळं ठीक करेल. लोक कडूलिंबाच्या झाडाची  परिक्रमा करतात. पण हॉस्पिटलमध्ये जात नाहीत. 

गावातील महिला सांगतात की, ते लोक घरीच सगळंकाही करतात. गर्भवती महिलेला सुद्धा ते हॉस्पिटलमध्ये नेत नाहीत. ना कुणाला बाहेरून येऊ देतात. शाळेत जाणारी मुलं दुपारी जेवणासाठी घरी येतात. ते शाळेतील अन्न खात नाहीत. जेवण करून पुन्हा शाळेत जातात. मासिक पाळी आली तर महिलांना घराच्याच नाही तर गावाच्या बाहेर रहावं लागतं. त्यांच्यासाठी गावाबाहेर एक रूम बांधण्यात आली आहे. गावातील लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळतो. त्यांच्या घरी धान्य पोहोचवलं जातं. जिल्हाधिकारी म्हणाले की, गावातील लोकांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी जागरूकता शिबीर चालवावं लागेल.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेAndhra Pradeshआंध्र प्रदेश