अंबानी (Ambani) परिवार देशातील सर्वात प्रसिद्ध परिवारापैकी एक आहे. धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांचा मोठे पुत्र लागोपाठ यशाच्या पायऱ्या चढत आहेत. तर तेच छोटा मुलगा अनिल अंबानी(Anil Ambani) यांचा बिझनेस गेल्या काही वर्षापासून घाट्यात सुरू आहे. ते कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. अनिल अंबानी हे तसे लाइमलाइटपासून दूर राहतात, मात्र, एका मुलाखती दरम्यान ते बालपणीच्या आठवणी ताज्या करून इमोशनल झाले होते.
एकदा अभिनेत्री सिमी ग्रेवालचा शो Rendezvous With Simi Garewal मध्ये अनिल अंबानीही गेले होते. तेव्हा त्यांनी त्यांचे वडील धीरूभाई अंबानी यांच्या मेहनतीचा आणि प्रवासाचा उल्लेख केला होता. सोबतच हेही सांगितले होते की, त्यांचं बालपण कसं गेलं.
चाळीमध्ये राहत होते धीरूभाई
अनिल अंबानी यांनी सांगितले की, ते त्यांच्या परिवारासोबत मुंबईतील कबूतरखाना परिसरातील एका चाळीत राहत होते. धीरूभाईंच्या प्रवासाबाबत सांगताना ते म्हणाले होते की, 'या स्वप्नाची सुरूवात तेव्हा झाली जेव्हा ते परदेशात गेले आणि पेट्रोल पंपावर काम करत होते. त्यावेळी त्यांच्या डोक्यात आलं की, मला भारतासाठी काहीतरी करायचं आहे'.
अनिल अंबानी यांनी पुढे सांगिततले की, 'माझ्या वडिलांसोबत जेव्हा लोक त्यांच्या विचारांबाबत बोलत होते. तेव्हा लोक त्यांना दिवसा स्वप्न बघणारा व्यक्ती म्हणत होते'.
तेच सिमी ग्रेवाल यांनी अनिल अंबानी यांना प्रश्न विचारला की, जेव्हा १९५९ मध्ये तुमचा जन्म झाला तेव्हा जीवन कसं होतं? यावर अनिक अंबानी हे जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणाले की, '१९५९ मद्ये माझे वडील भारतात परत आले होते. आमच्या परिवारात सहा लोक होते. त्यावेळी आमची दादी जिवंत होती. आम्ही सात लोक एका चाळीत राहत होतो. ही चाळ मुंबईच्या बॅकवर्ड भागातील कबूतर खान्यात होती'.
१०० लोकांसाठी एकच बाथरूम
अनिल अंबानी यांनी सांगितले की, 'ती एक फार मोठी चाळ होती. आम्ही चौथ्या फ्लोरवर राहत होतो. त्यात एक बेडरूम, हॉल आणि किचन होतं. आमच्या घरात बाथरूम नव्हतं. तिथे एक कॉमन टॉयलेट होतं. ज्यात त्या फ्लोरवरील कमीत कमी १०० लोक जात होते. आम्ही अशा वातावरणात मोठे झालो होतो. आमच्याकडे जास्त कपडे नव्हते. आम्ही एकमेकांचे कपडे शेअर करायचो. ही एक सामान्य बाब होती'.