सापाचं नाव घेतलं की, लोकांना घाम फुटतो आणि त्यातही जेव्हा समजतं की, तो कोब्रा आहे तर लगेच लोक सुरक्षित ठिकाणी लपतात. असंच काहीसं सिंगापूरमध्ये घडलं. इथे रेस्क्यू करणाऱ्या टीमला एका घरात कोब्रा असल्याची माहिती मिळाली होती. पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा लोक हैराण झाले. झालं असं की, ज्याला ते कोब्रा साप समजत होते तो मुळात एक इलेक्ट्रिक टूथब्रश होता.
सिंगापूरमध्ये एका घरात महिलेने आपल्या बेडरूममध्ये सापाचा आवाज ऐकला. ज्यानंतर तिने साप शोधणाऱ्या आणि पकडणाऱ्या टीमला फोन केला. त्यांना घरी बोलवलं. महिलेला शंका होती की, घरात कोब्रा साप आहे. शी यान नावाची महिलाने रेस्क्यू टीमला सापाच्या आवाजाची रेकॉर्डींग पाठवली होती. ज्यानंतर तज्ज्ञांनी घोषणा केली की, हा एका विषारी कोब्रासारखा वाटतोय.
रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आणि घरात लपलेल्या कोब्रा सापाला शोधू लागले. त्यांनी एक तासापर्यंत शी यानच्या घरात साप शोधला. त्यानंतर समोर आलं की तो आवाज खराब झालेल्या इलेक्ट्रिक टूथब्रशमधून येत होता आणि महिलेला वाटलं तो सापाचा आवाज आहे.
सत्य समोर आल्यावर महिलेला आठवलं की कशाप्रकारे टूथब्रश खराब झाला होता आणि त्याच्या बॅटरीच्या बॉक्समध्ये पाणी भरलं होतं. शी यानने सांगितलं की, 'ही समस्या सुरू झाली कारण माझ्या इलेक्ट्रिक टूथब्रशमध्ये पाणी भरलं होतं आणि तो खराब झाला होता.