एका मुलीला तिच्या पर्सची खरी किंमत जाणून आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. मुलीने ती पर्स 100 रुपयांपेक्षा कमी किमतीत विकत घेतली. मात्र नंतर ती लाखो रुपयांना विकली गेली आहे. मुलीने स्वतः हा व्हिडीओ सोशलवर शेअर करून घटनेची सविस्तर माहिती दिली. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये ही घटना घडली आहे.
29 वर्षीय चांडलर वेस्टने नोव्हेंबर 2021 मध्ये ऑनलाईन लिलाव प्रक्रियेदरम्यान 1920 च्या दशकातील अँटीक पर्स खरेदी केली होती, असे मेट्रो यूकेच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. यासाठी तिने एक पौंड (101 रुपये) कमी दिले होते. तथापि, जेव्हा चांडलरने ते विकत घेतले तेव्हा तिला त्याची किंमत काय आहे याची कल्पना नव्हती.
काही वेळाने तिला समजलं की ही अँटिक पर्स खऱ्या हिऱ्याची आहे. यामुळे पर्स 6,000 पौंडांना (6 लाख रुपयांपेक्षा जास्त) विकली गेली. चँडलर तिच्या व्हिडिओमध्ये म्हणते - लिलावात या पर्सवर कोणीही बोली लावायला तयार नव्हते. कारण ती खूप जुनी दिसत होती. अगदी प्राचीन. भावही 100 रुपयांपेक्षा कमी होता. पण मला ती आवडली आणि मी विकत घेतली.
खरेदी केल्यानंतर, चांडलरने पर्सची खरी किंमत शोधण्यास सुरुवात केली. यासाठी तिने फेसबुकची मदत घेतली. काही तज्ज्ञांशी संवाद साधला. एकाने त्यांना सांगितले की ही पर्स 1920 च्या दशकात लक्झरी फ्रेंच ब्रँड कार्टियरने बनवली असावी. चौकशीअंती ही बाब खरी ठरली.
चांडडलर म्हणते की माझ्या हातात 1920 ची कार्टियर पर्स आहे हे कळताच माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यात जडलेल्या हिऱ्यासह सर्व 12 दगड खरे होते. या वर्षी फेब्रुवारीमध्ये, चांडलरने पुन्हा पर्स लिलावासाठी ठेवली, जिथे ती 6 लाख रुपयांना विकली गेली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"