सध्या डेटिंग अॅपची चांगलीच चलती आहे. वेगवेगळ्या अॅप्सवर लोकांना प्रेम, मैत्री शोधणं सोपं जात आहे. यात सर्वात जास्त लोकप्रिय टिंडर हे अॅप आहे. यावर लोक राइट स्वाइप करून व्यक्तींना पसंती दर्शवतात. पुढे सगळं ठिक असेल तर डेटिंगही करतात. मनुष्यांसाठी हे ठिक आहे पण आश्चर्याची बाब म्हणजे आता गायींसाठीही असंच एक डेटिंग अॅप आलं आहे.
जसं टिंडर आहे तसं या गायींसाठीच्या अॅपचं नाव Tudder असं आहे. यातही टिंडरप्रमाणे राइट स्वाइप करायचं आहे. जो बैल तुम्हाला तुमच्या गायीसाठी पसंत असेल त्याच्या प्रोफाइलला राइट क्लिक करायचं आहे. नंतर या दोघांना प्रजननासाठी एकत्र आणलं जातं.
Tudder हे अॅप जास्त ब्रिटनमध्ये वापरलं जातं. या अॅपच्या मदतीने तुम्ही तुमच्या गायीसाठी जोडीदार बैल शोधत आहेत. नंतर यांना प्रजननासाठी एकत्र आणलं जातं. या अॅपमध्ये आपल्यासारखेच गायीचे आणि बैलांचे फोटो अपलोड करून माहिती द्यायची असते. गायीची आतापर्यंत कितीवेळा प्रसुती झाली आहे याचीही माहिती द्यावी लागते.
या अॅपच्या मदतीने शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होत आहे. ब्रिटनमधील शेतकऱ्यांच्या गायींनाही समस्या आहेत. म्हणजे योग्य बैलापासून प्रजनन न झाल्याने ब्रीडिंग खराब होते. याचा गायीच्या दुधावर प्रभाव पडतो. पण आता या अॅपच्या मदतीने शेतकरी योग्य बैलांची निवड करू शकत आहेत.