ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23- फेसबुक, व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट, इन्टाग्राम या सारख्या मेसेजिंग साइट्सवर असणाऱ्या इमोजी सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय आहे. या मेसेजिंग अॅपवर चॅट करताना आपण नेहमीच इमोजीचा भरमसाठ उपयोग करत असतो. ही अॅपलिकेशन्स जशी अपडेट होतात तशी त्यात नव्या इमोजीची भर पडते. आता अॅपल या कंपनीने वर्ल्ड इमोजी डेच्या दिवशी म्हणजेच १७ जुलै रोजी काही नवीन इमोजी लाँच केल्या. त्यात हिजाब इमोजीचाही समावेश आहे. एक इमोजी हिजाबमध्ये दाखवण्यात आली आहे. त्यामुळे या इमोजीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अॅपलनं लाँच केलेल्या या हिजाब इमोजीची कल्पना मात्र एका १६ वर्षांच्या मुलीची आहे. रऊफ अलहुमेदी असं या मुलीचं नाव आहे. स्वतःसाठी एक इमोजी असावा असं वाटलं. त्यामुळं हिजाब परिधान केलेल्या मुलीचा इमोजी तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, असं रऊफनं सांगितलं. रऊफ सध्या जर्मनीत राहते. ती मूळची सौदीची आहे.
आणखी वाचा
बकरीला झाले मानवी चेहऱ्याचे पिल्लू
फेसबुकवर करा व्हीआर लाईव्ह व्हिडीओ शेअरिंग
आता येतय अॅमेझॉनचं एनीटाईम मॅसेंजर
गेल्या वर्षी रऊफ आणि तिच्या मित्रांनी व्हॉट्सअॅपवर एक ग्रुप तयार केला होता. स्वतःच्या नावाची काहीतरी ओळख असावी असं या मित्रांना वाटतं. त्यांनी स्वतःची ओळख म्हणून एकेक इमोजी ठेवायचं असं ठरवलं. त्याचवेळी हिजाब परिधान केलेल्या रऊफला आपल्यासाठी काय इमोजी ठेवावं, असा प्रश्न पडला. हिजाब परिधान केलेली इमोजी असावी, अशी कल्पना तिला सुचली. त्यातून अॅपलनं लाँच केलेली ‘हिजाब इमोजी’ तयार झाली आहे.
रऊफ सध्या व्हिएन्नामध्ये राहते. गेल्या वर्षी तिनं हिजाब परिधान केलेली इमोजी असावी, असा प्रस्ताव यूनिकोड कॉन्सर्टियमकडे पाठवला. त्यांनी या इमोजीबाबत विचार केल्यानंतर ती विकसित केली आहे. अॅपलच्या या नव्या इमोजीच्या प्रस्तावाला अगदी काही वेळातच प्रसिद्धी मिळाली. यूनिकोड इमोजीच्या समितीनं हा प्रस्ताव मान्य केला. त्यानंतर रेड्डीट या अमेरिकन वेबसाइटचे सहसंस्थापक अॅलेक्सिस ओहानियन यांनी या इमोजीच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. त्यावेळी रऊफनं हिजाब इमोजीमागील कल्पना आणि उद्देश स्पष्ट केला. अनेकांनी तिच्या या संकल्पनेला पाठिंबा दर्शवला. तर काहींनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
माझी संकल्पना असलेली हिजाब इमोजी अॅपलने लाँच केल्याचा मला खूप आनंद आहे तसंच ही इमोजी दिसायला ही छान आहे, सगळ्यांच्या मेहनतीनंतर त्या इमोजीला स्थान मिळतं आहे, असं रऊफ अलहुमेदी हिने सांगितलं आहे.