1 एप्रिल ही तारीख लहानपणापासून आपल्या डोक्यात फिट बसली आहे. याचं कारणही तसेच आहे, एप्रिल फूल (April Fools) म्हणजे समोरच्याला मुर्ख बनवण्याचा हा दिवस. तसा हा दिवस नेहमीसारखाच. यात काही वेगळे नाही पण थोडीशी गंमत जोडली असते.
एरव्ही काही लोक एकमेकांना मूर्ख बनवताच पण हा खास ‘फुल’ म्हणजे मूर्खांचा दिवस म्हणूनच ओळखला जातो. एखाद्याला मुर्ख बनवले की ‘एप्रिल फुल डब्बा गुल’ म्हणत समोरच्याला चिडवले जाते. मात्र हा दिवस आला कुठून याचीही वेगळी गोष्ट आहे.
एप्रिल फुलबद्दल आतापर्यंत अनेक तर्कवितर्क लढवले जातात. १५८२ मध्ये पोप तेरावे ग्रेगरी यांनी रोमन कॅलेंडर आणलेमात्र त्याआधी सगळेच जण १ एप्रिलला नववर्ष साजरे करायचे पण पोपच्या नव्या दिनदर्शिकेने सारा घोळच झाला. या नव्या दिनदर्शिकेनुसार आता सगळ्यांनी १ एप्रिल ऐवजी १ जानेवारीला नववर्ष साजरं करावं असा आदेश काढण्यात आला.
रातोरात फर्मान काढून जर कोणी आपले सणच बदलले म्हणून अनेकांना ते रुचलं नाही, त्यामुळे लोकांनी याला कडाडून विरोध केला. काही असेही लोक होते ज्यांनी मात्र १ जानेवारीला नववर्ष साजरं करण्यास ठाम नकार दिला
आम्ही १ एप्रिललाच नववर्ष साजरं करू या निर्णयावर ते ठाम राहिले. त्यामुळे या सगळ्यांनाचा मुर्ख ठरवण्यात आले. तेव्हापासून १ एप्रिल हा दिवस मुर्खाचा दिवस म्हणजे ‘एप्रिल फुल’ डे साजरा करण्यात येऊ लागला.
इतकचं नाही तर १३ व्या शतकात इंग्लंडचा राजा रिचर्ड सेकंड व बोहेमियाची राजकुमारी यांचा साखरपुडा ठरला व त्याची तारीख ३२ मार्च १३८१ अशी जाहीर केली गेली. लोकांनीही या तारखेवर विश्वास ठेवला पण मार्चमध्ये ३२ ही तारीखच नाही हे कुणाच्याच लक्षात आले नाही. म्हणजेच एक प्रकारे ते मूर्ख ठरले. व ३२ मार्च म्हणजे १ एप्रिल असा ही अर्थ त्यातून काढला गेला.
एप्रिल फूलच्या इंटरेस्टींग गोष्टी
१) एप्रिल फूलचं सर्वात लोकप्रिय प्रॅंक एखाद्या पाठीवर कागदाचा मासा किंवा स्टीकर चिटकवणे आहे. याला एप्रिल फिश असंही म्हटलं जातं.
२) पहिला एप्रिल फूल डे कधी साजरा केला होता माहीत आहे का? पहिल्या मुर्ख दिवसाचा रेकॉर्ड १३९२ मध्ये आढळला होता. याचा अर्थ हा दिवसा तेव्हापासून साजरा केला जात असावा असा अंदाज आहे.
३) काही देशांमध्ये एप्रिल फूलच्या गमती-जमती केवळ दुपारपर्यंतच केल्या जातात.
४) स्कॉटलॅंडमध्ये लोक दोन दिवस मुर्ख दिवस साजरा करतात. दुसऱ्या दिवसाला इथे 'टेली डे' म्हटले जाते.
५) Google ने एप्रिल फूलच्या पूर्वसंध्येला Gmail लॉन्च केलं होतं. पण अनेकांना हेच वाटलं होतं की, ही एक गंमत आहे. पण हे खरं होतं.