कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी जगभरातील सर्वच देशांमध्ये वॅक्सीनेशनचं अभियान वेगाने सुरू आहे. जास्तीत जास्त लोकांना कोरोना वॅक्सीन दिली जावी हा यामागचा उद्देश आहे. पण अजूनही काही लोक असे आहेत ज्यांना वॅक्सीन देण्यासाठी गार्डसोबतच डॉक्टर्सना घरांच्या छतावर चढावं लागत आहे. अजूनही काही लोक वॅक्सीनला इतके घाबरले आहेत की, ते घराचा दरवाजाही उघडायला तयार नाही.
सोशल मीडियावर असाच एक मजेदार व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की, वॅक्सीन देण्यासाठी हेल्थ वर्कर्सना किती मेहनत घ्यावी लागते. (हे पण बघा : Video: लस घेणाऱ्या महिलेची झाली भयंकर अवस्था; तिला पाहून आजूबाजूचे लोकही घाबरले)
रूपिन शर्मा यांनी यांनी सांगितलं की, हा व्हिडीओ अर्जेंटिनाचा आहे. यात तुम्ही बघू शकता की, काही गार्ड्स आणि डॉक्टर्स एका घराच्या छतावर एका व्यक्तीला पकडून आहे. हे लोक त्याला जबरदस्ती वॅक्सीन लावण्याचा प्रयत्न करत आहेत. तर ती व्यक्ती गार्ड्च्या तावडीतून सुटण्याचा शक्य तो प्रयत्न करत आहे.
हा व्हिडीओ तेथीलच एक व्यक्तीने तयार केला असून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडीओवर यूजर्सच्या अनेक मजेदार कमेंट्सही येत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'एक आपण आहोत जे मास्कवरून टोकलं तर पोलिसांची सोशल मीडियावर खरडपट्टी काढतो'. तर दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले की, 'भारतातही असंच व्हायला पाहिजे'.
दरम्यान वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहून वॅक्सीनेशनचं अभियान आणखी वेगाने करण्याची सूचना केली आहे. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना वॅक्सीन दिली जावी. मात्र तरी सुद्धा काही लोक अफवांमुळे वॅक्सीन घेत नाहीयेत. त्यामुळे लोकांना वॅक्सीन देण्यासाठी हेल्थ वर्कर्सना अडचणींचा सामना करावा लागत आहे.