(Image Credit : Getty)
चीनचा एक आर्टिस्ट त्याच्या अजब कृत्यामुळे चर्चेत आहे. या व्यक्तीने आर्टच्या नावावर एका प्रदर्शनात महिलांचे १९७ अंर्तवस्त्र सादर केले. बीजिंगमध्ये राहणारा ज्हांग मिंगशीनचा हा कारनामा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटकही केली आहे.
बीजिंग न्यूजच्या रिपोर्टनुसार, चीनमध्ये दरवर्षी सिग्नेचर आर्ट प्राइज नावाची एक आर्ट स्पर्धा घेतली जाते. ब्रिटनच्या एका आर्ट प्रोग्रामने प्रेरित ही स्पर्धा २००६ पासून सुरू आहे. या स्पर्धेचा उद्देश आर्ट विश्वातील चांगल्या लोकांना नाव आणि सन्मान देणं हा आहे.
ज्हांगच्या आर्टपीसचं टायटल १९७ असंच होतं. त्याने दावा केला की, त्याने गेल्या दोन वर्षात महिलांचे अंर्तवस्त्र जमा केलेत. यासोबतच ४७ सेकंदाचा एक व्हिडीओही आहे. ज्यात ज्हांग या कपड्यांना ऑर्गनाइज करताना दिसत आहे. ज्हांगने सांगितले की, त्याला या आर्टपीसची प्रेरणा चारर वर्षाआधी मिळाली होती. या वादग्रस्त आर्टिस्टने सांगितले की, त्याच्या गर्लफ्रन्डचे अंर्तवस्त्र कुणीतरी चोरी केले होते. यानंतर या व्यक्तीने स्वत:ला अंडरगारमेंट्स चोर बनण्याचा निर्णय घेतला होता. आणि ज्हांगने सांगितले की, त्याने अनेक महिलांचे अंर्तवस्त्र बाल्कनीतून चोरी करत होता. (हे पण वाचा : बिल गेट्स यांच्या घटस्फोटासाठी या महिलेला धरलं जात आहे जबाबदार, तिने दिली यावर प्रतिक्रिया...)
जेव्हा सिग्नेचर आर्ट प्राइजने १९७ नावाच्या या आर्टपीसला आपल्या वेबसाइटवर टाकलं तेव्हा वाद निर्माण झाला. यावरून लोका चीनमधील सोशल मीडियावर टीका करत आहेत. त्यानंतर त्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. लोकांनी या व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली.
एका महिलेने यावर लिहिले की, ही व्यक्ती फारच विचित्र आहे. महिलांचे अंर्तवस्त्र चोरी करणं गुन्हा आहे आणि आर्टच्या नावावर ही व्यक्ती गुन्हा करत आहे. मात्र, अटक झाल्यावर या व्यक्तीचा सूर बदलला आहे. बीजिंग पोलिसांनी सांगितले की, जेव्हा या व्यक्तीची चौकशी केली तेव्हा त्याने सांगितले की, त्याने ही अंर्तवस्त्र चोरी केले नाही तर विकत आणले आहेत. (हे पण वाचा : एक्स बॉयफ्रेन्डला मारण्यासाठी पाठवलेलं विष टाकलेलं चिकन डिलीवरी बॉयच्या मुलाने खाल्ल, गमावला जीव...)
दरम्यान ज्हांग याआधीही आपल्या कारनाम्यांमुळे चर्चेत होता. या व्यक्तीने एक शॉर्ट फिल्म बनवली होती. ज्यात तो म्हणाला होता की, त्याच्या डोक्यात अशा अनेक आयडिया आहेत ज्या करण्यासाठी समाज त्याला परवानगी देत नाही. ही व्यक्ती म्हणाली होती की, त्याला काही लोकांना मारायचं आहे आणि बॅंक लुटायची आहे.