मालमत्तेवर कर्ज घेतल्यानंतर बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ती गहाण ठेवावी लागते. जोपर्यंत कर्जदार त्याचे कर्ज फेडत नाही तोवर मालमत्ता बँकेच्या ताब्यात असते. वाढत्या महागाईमुळे लोकांना कर्ज फेडण्यास अनेक वर्ष लागतात. त्यामुळे मालमत्तेचे कागद बँकांकडेच पडून असतात. परंतु एका मुलीनं वयाच्या २५ व्या वर्षी जे काही केले ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तिने कोट्यवधीचं घर खरेदी केले आणि त्याचे कर्ज अवघ्या १ वर्षात फेडलं.
२५ वर्षीय क्लोई, जिनं वयाच्या १६ व्या वर्षी घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहिले. वयाच्या २५ व्या वर्षी तिने हे स्वप्न पूर्ण केले. २ लाख १० हजार पाऊंड म्हणजे तब्बल २ कोटीला तिने एक घर खरेदी केले. बँकेकडून घेतलेले कोट्यवधीचे कर्ज फेडणे सोप्पं नाही याची कल्पना क्लोईला होती. परंतु या मुलीने कर्ज फेडण्यासाठी कॉल सेंटरच्या जॉबसोबतच बार टेंडरची नोकरी करू लागली. जेणेकरून डोक्यावरील कर्जाचा बोझा हलका होईल. पण त्यानेही व्याप कमी झाला नाही.
कमाई करण्यासाठी निवडला अन्य मार्गक्लोईनं एका एडल्ट साइटसाठी काम करण्यास सुरुवात केली. डेली स्टारनुसार, या मुलीने तिच्या या कामातून इतकी कमाई केली की अवघ्या १ वर्षात तिने सर्व कर्ज फेडलं. आता ती दर महिना ५७ लाख रुपये कमावते. क्लोईनं मागील वर्षी तिची नोकरी सोडली. एक कंटेंट क्रिएटर म्हणून फुल टाईम काम करू लागली. ज्याठिकाणी मोठ्या संख्येने चाहते तिला फॉलो करू लागले.
द मिररशी बोलताना क्लोई म्हणाली की, माझ्या स्वत:चं घर असावं हे लहानपणापासून स्वप्न होते. त्यासाठी मी १६ व्या वर्षापासून काम करतेय. जितके शक्य होईल तितकी बचत मी केली. त्यानंतर स्वप्नातलं घर तयार केले. आज माझ्याकडे १ लाख २६ हजार फोलोअर्स आहेत. त्यांना मी सर्व्हिस देणे सुरू केले. अन्य साईटच्या तुलनेत इन्स्टाग्राम सुरक्षित असल्याचा क्लोईचा दावा आहे.