इंटरनेटवर सतत नवनवीन गोष्टी समोर येत असतात. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला ऑडी कारमध्ये चहा विकताना दिसत आहे. कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेली ही घटना सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आणि आता ती जोरदार व्हायरल होत आहे.
व्हिडीओ पाहून असं दिसतं की, कारच्या मालकाने आपल्या नवीन मार्केटिंग तंत्राचा भाग म्हणून ऑडी आणली होती. असे काम सुरू करणारे तरुण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत राहतात. आलिशान कारमधून चहा विकणे हे या तरुणाईचे अनोखे मार्केटिंग तंत्र असल्याचे दिसते. आशिष त्रिवेदी यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
रस्त्याच्या कडेला एका पांढऱ्या ऑडीच्या मागे लोकांचा ग्रुप उभा असलेला दिसतो. एका टेबलावर चहा आणि इतर पेये दिली जात आहेत. इंटरनेटवर शेअर केल्याच्या काही दिवसांतच हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. व्हिडिओला आता हजारो लाईक्स आणि 361 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. महागड्या लक्झरी कारमधून चहा विकण्याच्या व्यावसायिक कल्पनेने अनेक युजर्स आश्चर्यचकित झाले.
सोशल मीडिया युजर्सपैकी एकाने 'ऑडी चायवाला' असं म्हटलं आहे. तर अनेक युजर्सनी व्हिडिओवर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. काही युजर्सनी सांगितले की त्या व्यक्तीने ऑडी खरेदी केली आणि आता कारचा ईएमआय भरण्यासाठी चहा विकत आहे. तर इतर युजर्सनी सांगितले की कारचा मालक ऑडीचा चहा विकून मर्सिडीज-बेंझ जी वॅगन खरेदी करण्याचा विचार करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"