उत्तर प्रदेशातील औरैया येथे एका मुलीचे भगवान श्रीकृष्णाशी लग्न झाले. मंत्रोच्चार आणि सप्तपदी पूर्ण केल्या. पूर्ण रितीरिवाजाने पार पडलेल्या या लग्नात कुटुंबातील सर्व सदस्यही सहभागी झाले होते. विशेष म्हणजे आपल्या मुलीच्या निर्णयाने आई-वडील खूश होते. या लग्नात पालकांनी कन्यादानही केले. मुलीची बाजूचे लोक आता भगवान कृष्णाला जावई म्हणून निवडल्याबद्दल खूप आनंदी आहे. ते म्हणतात की, भगवान श्रीकृष्ण आता आमचे नातेवाईक झाले आहेत आणि आता आम्ही त्यांची जावई म्हणून पूजा करू.
जिल्ह्यातील बिधुना शहरातील ही अनोखी घटना आहे. येथे राहणारी 30 वर्षीय रक्षा एमएचे शिक्षण घेतल्यानंतर LLB करत आहे. एकीकडे रक्षा भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन होती, तर दुसरीकडे तिचे आई-वडील लग्नाची चर्चा करत होते. पण रक्षा फक्त भगवान श्रीकृष्णाशीच जोडलेली होती. घरच्यांना ती वारंवार लग्नाला नकार देत होती. दरम्यान, एके दिवशी रक्षाने सांगितले की, तिच्या स्वप्नात भगवान श्रीकृष्णाचे दर्शन झाले आहे. स्वप्नातच देवाला आपला पती मानून तिने त्यांना हार घातला.
रक्षाने तेव्हापासून भगवान कृष्णाला तिचा वर म्हणून निवडण्याचा संकल्प केला. कृष्णासोबत एकनिष्ठ असलेल्या रक्षाने सर्व काही तिच्या आई-वडिलांना सांगितले आणि त्यांचे मन वळवले. तर दुसरीकडे मुलीच्या जिद्दीपुढे आई-वडील काहीच बोलू शकले नाहीत आणि त्यांनीही मुलीच्या आनंदासाठी होकार दिला. 11 मार्च 2023 रोजी कुटुंबीयांची संमती मिळाल्यानंतर रक्षाचा विवाह भगवान कृष्णाशी हिंदू रितीरिवाजांनुसार झाला. आता रक्षा खूप आनंदी आहे कारण तिला भगवान श्रीकृष्णाच्या रूपात वर मिळाला आहे.
रक्षाच्या पालकांनी आज तकला सांगितले की, त्यांचा आनंद त्यांच्या मुलीच्या आनंदात आहे. सर्व हिंदू विधींचे पालन करून आम्ही आमच्या मुलीचे भगवान श्रीकृष्णाशी लग्न लावले. आता भगवान श्रीकृष्ण आमचे जावई म्हणून घरात बसतील. आम्ही खूप आनंदी आहोत. त्याचवेळी मोठी बहीण अनुराधा देखील रक्षाच्या निर्णयाने खूप खूश होती. ते म्हणाले की, छोट्या बहिणीने भगवान कृष्णाला तिचा वर म्हणून निवडले आहे. आता भगवान श्रीकृष्ण माझे नातेवाईक झाले आहेत आणि आमचा मथुरेशी चांगला संबंध आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"