(Image Credit : www.cnn.com)
तुम्ही अनेकदा मोठ्या आणि शानदार हॉटेल्समध्ये वेळ घालवला असेल. कुटुंबियांसोबत किंवा मित्रांसोबत तुम्ही कुठे बाहेर गेला असाल तर हॉटेल नक्कीच सर्च केलं असेल. पण आता जर तुम्हाला पृथ्वीऐवजी अंतराळातील लक्झरी हॉटेलमध्ये सुट्टी घासवण्याची संधी मिळाली तर? होय! तुम्ही योग्य वाचत आहात. लवकरच अंतराळात एक लक्झरी हॉटेल बनवण्याची तयारी सुरु आहे. 2022 पर्यंत हे हॉटेल तयार होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
ऑरोरा स्टेशन असेल नाव
या हॉटेलचं नाव ऑरोरा स्टेशन असणार आहे. हे हॉटेल तयार करण्याची घोषणा अमेरिकेतील स्पेस टेक्नॉलॉजी स्टार्ट-अप 'ओरियन स्पेन' ने केली आहे. अंतराळात तयार होणा-या या हॉटेलची लांबी 43.5 फूट आणि रुंदी 14.01 फूटाची असणार आहे. पृथ्वीच्या कक्षेपासून 321 किमी दूर हे हॉटेल तयार केलं जाणार आहे.
केवळ चार प्रवाशांसाठी जागा
आकाशात राहण्याचा आनंद देणा-या या हॉटेलचा आकार एका प्रायव्हेट जेटसारखा असेल. हे जेटची 90 मिनिटांचा प्रवास करण्याची क्षमता असेल. या हॉटेलमध्ये दोन क्रू मेंबर्ससह चार प्रवाशी राहू शकतील इतकी जागा असेल.
हॉटेलपर्यंत पोहचण्याला किती वेळ आणि किती खर्च
अंतराळात तयार होणा-या या हॉटेलमध्ये पोहोचण्यासाठी 12 दिवस लागणार आहेत. आता या हॉटेलमध्ये जाण्यासाठी किती खर्च येणार हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर या हॉटेलमध्ये राहण्यासाठीचा खर्च हा 9.5 मिलियन म्हणजेच 61 कोटी रुपये इतका लागणार आहे.
हॉलिवूड कलाकारांनी केली अॅडव्हांस बुकिंग
या हॉटेलमध्ये राहण्यासाठी 51 लाख रुपयांमध्ये अॅडव्हांस बुकिंग सुरु आहे. आत्तापर्यंत हॉलिवूड सेलिब्रिटी टॉम हॅक्स, लियोनार्डो डिकॅप्रियो आणि कॅटी पेरीने अॅडव्हांस बुकिंग केलं आहे.