आपले जग (world) विविध रहस्यमय व चित्रविचित्र जागांनी (weird places) भरलेले आहे. काही ठिकाणी अशा काही विचित्र रहस्यमयी गोष्टी असतात की त्यांना पाहुन आपण हबकतो, अचंबित होतो. ऑस्ट्रेलियातील (Australia) बास रिव्हर वॅली (Bass River Valley)अशाच एका विचित्र गोष्टी साठी प्रसिद्ध आहे. तिथे असे काही विचित्र जीव (weird animals)आहे ज्यांना पाहुन पहिल्यांदा तुम्हाला किळस वाटेल आणि मग भीती!
जगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे जीव आढळतात. त्यातील काही जीव चित्रविचित्रही (weird creatures) असतात. ऑस्ट्रेलियातील बास रिव्हर व्हॅलीला रहस्यमय वॅली (secrete valley) असेही म्हटले जाते. या व्हॅलीमध्ये एखाद्या सापासारखे दिसणारे प्राणी आढळतात. या जीवांकडे बघुन तुम्हाला हे सापच वाटतील पण ते गांडुळ (earthworms) आहेत. तुम्ही आतापर्यंत पावसाळ्यात पाण्यात अथवा चिखलात छोटे छोटे गांडुळ बघितले असतील पण हे गांडुळ जरा वेगळे आहेत.
तुमची सापांना बघुन तर घाबरगुंडी उडतच असेल पण या वळवळणाऱ्या गांडुळांना पाहुन तुमची झोप उडेल. ते एखाद्या सापापेक्षाही लांब आहेत. हे ठिकाण याच गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. लोक त्यांना पहिल्यांदा पाहताच सापच समजतात.
गांडुळांची ही रहस्यमय जागा याच गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. ती ऑस्ट्रेलियातील South Gippsland येथे असून येथे जगातील सर्वात लांब गांडुळं सापडतात. हे गांडुळ जमिनीवर फार क्वचितच दिसतात. आणखी एक विशेष बाब म्हणजे ते अशाच ठिकाणी राहतात जिथे माणसं राहत नाहीत.