Gold In Australia : विचार करा की, तुम्ही एका अनोळखी रस्त्यावरून जात आहात आणि तुम्हाला समजलं की, हा केवळ रस्ता नाही तर सोन्याची खाण आहे. तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीसोबत असंच काहीसं झालं. ही व्यक्ती एका रस्त्याने जात होती, पण त्याच्या हातात मेटल डिटेक्टर होतं. या मेटल डिटेक्टरच्या मदतीने व्यक्तीच्या हाती सोन्याचा तुकडा लागला. ज्याची किंमत कोट्यावधी रूपये होती.
ही घटना आस्ट्रेलियातील विक्टोरियाची आहे. 'द गार्जियन' आपल्या एका रिपोर्टमध्ये सांगितलं की, ही व्यक्ती कोणतंही प्लानिंग न करतात एक साधारण मेटल डिटेक्टर घेऊन जात होती. तेव्हा त्यातून बीप-बीप आवाज आला. त्याने एकडे-तिकडे शोध घेतला तर त्याला सोनं सापडलं. जेव्हा या सोन्याच्या तुकड्याचं वजन केलं तर ते अडीच किलो भरलं.
रिपोर्टमध्ये हेही सांगण्यात आलं की, या सोन्याची किंमत जवळपास एक कोटी 31 लाख रूपये होती. व्यक्तीला हे सोनं व्हिक्टोरियाच्या गोल्ड फिल्डमध्ये सापडलं होतं. हे ठिकाण 1800 दरम्यान सोन्याचा खजिना होतं. या व्यक्तीला हे सोनं साधारण साडे चार किलोच्या दगडात सापडलं. हे सोनं खरेदी करणाऱ्या हॅरेन कॅम्प यांनी सांगितलं की, गेल्या 43 वर्षात त्याने अशी वस्तू पाहिली नाही आणि ही फार अद्भुत आहे.
इतकंच नाही तर सोनं खरेदी करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की, अनेकदा लोक असे दगड घेऊन येत होते, जे सोन्यासारखे दिसत होते. पण जेव्हा ही व्यक्ती आली आणि त्याच्याकडील सोनं चेक केलं तर ते अडीच किलो भरलं. आता ऑस्ट्रेलियात अशा सोनं सोपडल्याच्या घटना घडतच नाहीत. पण हेही तितकंच खरं आहे की, जगात सगळ्यात जास्त गोल्ड रिझर्व ऑस्ट्रेलियाकडेच आहे.