अमेरिकेतील 9/11 हल्ल्याचे अचूक भाकीत करणार्या बाबा वंगा यांच्या आणखी एका भविष्यवाणीने संपूर्ण जगाला धडकी भरवली आहे. बाबा वेंगा यांनी 2023 मध्ये अवकाळी पाऊस, भूकंप आणि सौर वादळांबरोबरच अणु हल्ल्याचीही भविष्य वाणी केली आहे. त्यांची ही भविष्यवाणी सर्वाधिक भीतीदायक आहे. महत्वाचे म्हणजे, 2023 मध्ये तिसरे महायुद्ध सुरू होईल आणि या वर्षाच्या अखेरीस अणू हल्ला होईल, यामुळे पृथ्वीवर भयंकर हाणी होईल, असे म्हटले होते.
न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, बल्गेरियातील या दृष्टिहीन महिलेचा मृत्यू 1996 मध्ये झाला होता. मात्र त्यांनी आतापर्यंत ज्या काही भविष्यवाण्या केल्या आहेत त्या सर्व जवळपास खऱ्या ठरल्या आहेत. 2023 साठीही त्यांनी अनेक भाकितं सत्य सिद्ध झाली आहेत. 2023 मध्ये अनेक मोठ्या उलथापालथी होतील. शक्तिशाली भूकंप होतील. अवकाळी पाऊस पडेल आणि वाळवंटातही पूरसदृश परिस्थिती निर्माण होईल. याशिवाय वेंगा यांनी सौर वादळाचाही अंदाज वर्तवला होता.
सत्य सिद्ध होत आहेत भाकीतं -बाबा वेंगा यांची अनेक भाकीतं सत्य सिद्ध झाली आहेत. त्यांनी भूकंप होण्याचे भाकितही वर्तवले होते. यानुसार, याच वर्षी तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपानेही भयंकर हाणी झाली. यात 50000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर लाखो लोक बेघर झाले आहेत. आजही तेथील परिस्थिती पूर्णपणे रुळावर आलेली दिसत नाही. याशिवाय, त्यांनी यावर्षाच्या अखेरपर्यंत भयंकर अणवस्त्र हल्ल्याचे भाकीतही केले होते. यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. यातच चीन-अमेरिकेतील तणाव आणि रशिया-युक्रेन संघर्षामुळे याची भीती आणखीनच वाढते.
आशियावर पसरतील विषारी ढग -बाबा वेंगा यांच्या फॉलोअर्सनुसार, त्यांनी 2023 मध्ये मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पात स्फोट होण्याची भविष्यवाणी वर्तवली होती. यामुळे संपूर्ण आशिया खंडावर विषारी ढग पसरतील. यामुळे जगातील सर्वच देशांत गंभीर आजार होतील, कारण अणुस्फोटामुळे भयंकर किरणोत्सर्ग होऊन सर्वत्र मोठी हाणी होईल.