Baba Vanga Predictions 2023: जगभरात असे अनेक भविष्यकार आहेत, ज्यांच्या भविष्यवाण्यांवर जगातील अनेक लोक विश्वास ठेवतात. या सर्व भविष्यकारांमध्ये नॉस्ट्रेदमस आणि बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्यांवर खूप चर्चा केली जाते. याचे कारण म्हणजे त्यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत.
कोण आहे बाबा वेंगा?बाबा वेंगा जगातील प्रसिद्ध भविष्यकार होते. त्यांचे संपूर्ण नाव वांगेलिया पांडेवा गुश्तारोवा होते. त्या बल्गेरियन स्त्री होत्या. त्यांनी बल्गेरियातील कोझुह पर्वताच्या भागात आपले आयुष्य घालवले. पुढे त्या बाबा वेंगा म्हणून प्रसिद्ध झाल्या. त्यांचा जन्म 1911 साली झाला होता. मात्र वयाच्या 12 व्या वर्षीच त्यांची दृष्टी गेली. 1996 मध्ये वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. पण मरण्यापूर्वी बाबा वेंगा यांनी 5079 पर्यंत जगाविषयी भाकीत केले आहेत.
दरवर्षी बाबा वेंगा यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरते. 2023 सालासाठीसुद्धा बाबा वेंगा यांनी अनेक भयंकर भाकिते केली होती, त्यातील अनेक खरी ठरत आहेत. 2023 वर्ष सुरू होऊन आतापर्यंत 4 महिने उलटले असून सध्या मे महिना सुरू आहे. पण इतक्या कमी वेळात बाबा वेंगाच्या अनेक भाकितांपैकी तीन भाकिते खरी ठरली आहेत.
बाबा वेंगाचे आतापर्यंत 3 भाकिते खरे ठरले आहेत
अवकाळी पाऊस : बाबा वेंगा यांनी भारतासाठी भाकीत केले होते की, यावर्षी अवकाळी पाऊस पडेल आणि असा पाऊस पडेल की वाळवंटातही पूरसदृश परिस्थिती दिसू लागेल, त्याचा परिणाम भारतात दिसून येत आहे. यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच भरपूर पाऊस झाला. एप्रिल महिन्यात मान्सूनसारखा पाऊस पडला आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रिमझिम पाऊस पडत होता. त्यामुळे उन्हाळ्यातही तापमानात घट झाली होती. अनेक दशकांनंतर असा अवकाळी पाऊस भारतात दिसल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्येही अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बाबा वेंगाची ही भविष्यवाणी खरी ठरल्याने लोकही आश्चर्यचकित झाले आहेत.
सौर वादळ: 2023 मध्ये बाबा वेंगा यांनी सौर त्सुनामीची भविष्यवाणी केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांचे हे भाकीत खरे ठरले. अलीकडेच शास्त्रज्ञांनी सूर्यामध्ये पृथ्वीपेक्षा सुमारे 20 पट मोठे छिद्र शोधून काढले आणि त्यातून निघणाऱ्या रेडिएशनचा प्रभाव भारतातही दिसून आला.
तुर्की भूकंप: बाबा वेंगा यांनी भाकीत केले होते की, 2023 मध्ये तुर्कस्तानमध्ये विनाशकारी भूकंप येईल आणि बाबा वेंगाच्या या भविष्यवाणीलाही पुष्टी मिळाली. या वर्षी तुर्की आणि सीरियामध्ये धोकादायक भूकंप झाला, ज्यामध्ये 50-55 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला.