विमानात जन्मलेल्या चिमुकलीची सध्या चर्चा सुरू आहे. तिने अचानक विमान प्रवासादरम्यान या विश्वात येऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. इंडिगोच्या दिल्ली ते बँगलुरू विमानात बुधवारी एका महिलेनं गोंडस बाळाला जन्म दिला आहे. अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. दिल्ली ते बँगलुरू या दरम्यानच्या प्रवासात 6 ई 122 मध्ये एका प्री मॅच्यूर बाळाचा जन्म झाला. वायुसेनेचे रिटार्यर्ड कॅप्टन क्रिस्टोफर यांनी लहान मुल आणि महिलेचे काही फोटोज आणि व्हिडीओज ट्विट केले होते.
या ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की, बुधवार संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटांनी या बाळाला जन्म दिला. सात वाजून ४० मिनिटांनी विमान बँगलुरू विमानतळावर पोहोचले. एअरपोर्ट इंडीगो फ्लाईटच्या सगळ्या स्टाफने या महिलेने स्वागत केलं आणि अभिनंदनही केलं. सध्या आई आणि बाळ दोन्ही सुखरूप आहेत. एविशन इंडस्ट्रीजच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली आणि बँगलूरू विमानात 6E 122 मध्ये प्रवासात एका बाळाचा जन्म झाला. विमानातील crew मेंमर्सचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. सोशल मीडियावर हे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
याआधीही एका महिलेने विमानात बाळाला जन्म दिला होता, आयुष्यभर फ्री विमान प्रवास करण्याची सुविधा त्या क्षणापासून मिळाली. ही घटना आहे इजिप्टएअर फ्लाइट MS777 मधील होती. हे विमान कैरोतून लंडनला जात होतं. या विमानात प्रवास करत होती. यमनची एक महिला प्रवाशी जी गर्भवती होती. या महिलेचं नाव हियॅ नस्र नाजी दाबन असं आहे. तिच्या ड्यू डेटला वेळ होता. त्यामुळे ती लंडनला जात होती. पण तिच्या पोटात वाढत असलेल्या चिमुकलीच्या नशीबात काहीतरी वेगळंच होतं. जशी विमानाने भरारी घेतलली थोड्याच वेळात महिलेच्या पोटात कळा येऊ लागल्या होत्या. लय भारी! डिलिव्हरी बॉय बनून स्वप्न पूर्ण केलं, हजारोंना विकली जातेय 'त्या' नं बनवलेली सायकल
पायलटला जेव्हा याबाबत सांगण्यात आले तेव्हा त्याने इमरजन्सी लॅंडींगची तयारी सुरू केली होती. इमरजन्सी लॅंडींग म्युनिकमध्ये करण्यात आली होती. पण त्याआधीच विमान रनवेवर उतरण्याआधीच चिमुकलीचे हवेतच जन्म घेतला. विमानात असलेल्या एका प्रवाशी डॉक्टरने या महिलेची डिलेव्हरी केली. चिमुकलीच्या जन्मानंतर विमान सेवेकडून ट्विटरवरून सर्वांना ही माहिती दिली. तसेच तिला आता इजिप्टएअरकडून आयुष्यभर प्रवास फ्री राहणार अशीही माहिती देण्यात आली होती. औरंगाबादच्या शेतकऱ्यानं पिकवली काश्मिर सारखी सफरचंद; २० वर्षांपर्यंत येतात फळं