सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये हत्ती जन्माला येताच चालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, परंतु नुकताच जन्माला आलेल हे पिल्लु चालण्यासाठी सक्षम नाही. तो उठतो आणि चालण्याचा प्रयत्न करतो. पण अंगात पुरेशी ताकद नसल्यामुळे तो चालताना वारंवार पडतो. चालण्याच्या प्रयत्नात त्याला कुठे ईजा होवू नये म्हणून मध्येच त्याची आई त्याला सावरताना दिसते. एकदा पडल्यानंतरही हे पिल्लु डोळेझाक करून उभे राहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सध्या हत्ती आणि त्याच्या बाळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ फॉरेस्टर ऑफिसर प्रवीण कसवान यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, आज हे पिल्लु चालण्यासाठी धडपड करत आहे. त्याच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे परंतु तो दिवसही फार दूर नाही जेव्हा हा लहान हत्ती 600 किलो हत्तीचे रूप धारण करेल आणि आपल्या भारदस्त पायाने धरती हादरवेल.
या व्हिडिओमध्ये आपण हत्तीचे बाळ जमिनीवर रेंगाळत असल्याचे स्पष्टपणे पाहू शकता. आणि जेव्हा जेव्हा तो त्याच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो पडतो. त्याचवेळी, त्याची आई त्याला सोडेंन बाजूला उभे राहण्यास मदत करताना दिसते. परंतु वारंवार प्रयत्न करूनही हे पिल्लु अयशस्वी होते. शेवटी हे पिल्लु काही मिनिटांसाठी जमिनीवर बसते आणि नंतर उठते आणि पूर्ण शक्ती लावत पुन्हा एकदा चालण्याचा प्रयत्न करते.
सोशल मीडियावर हत्तीच्या या पिल्लाची चालण्यासाठी धडपड पाहून अनेकांनी थक्क करून सोडले आहे. या व्हिडीओला नेटीझन्सनी खूप सारी पसंती दिली आहे. काही तासातच व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर 44 हजाराहून अधिक लाईक्स आणि 90 हजार कमेंटसचा वर्षाव झाला आहे.