(छायाचित्र - प्रातिनिधीक)
उत्तर प्रदेशातील बागपतमधून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. इथे एका तरूणीने स्वत:चा एक व्हिडीओ व्हायरल करून गोंधळ उडवला आहे. या व्हिडीओत तरूणीने सांगितले की, तिचे आई-वडील तिला विकत आहेत आणि त्यांनी तिला डांबून ठेवलंय. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडीओ एका सामाजिक संस्थेपर्यंत पोहोचला आणि ही संस्था पोलिसांच्या मदतीने मुलीच्या घरी पोहोचली. पण तरूणीची चौकशी केली गेली तेव्हा जे समोर आलं ते ऐकून सगळेच हैराण झाले.
बागपतच्या टीपी नगरमध्ये राहणाऱ्या एका तरूणीने तिचा एक व्हिडीओ तयार केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. यात तिने आरोप केला होता की, तिचे आई-वडील तिला विकणार आहेत आणि अनेक महिन्यांपासून तिला बांधून ठेवलं आहे. तिला 5 लाख रूपयात हरयाणातील एका व्यक्तीला विकणार असल्याचही ती म्हणाली होती.
व्हिडीओ व्हायरल झाल्यावर परिसरात एकच गोंधळ उडाला. सामाजिक संस्था तिच्या मदतीसाठी पोहोचली. त्यांनी तरूणीची माहिती काढली आणि चौकशीतून समोर आले की, तरूणीला मितली गावात एका नातेवाईकाकडे ठेवण्यात आलंय. संस्थेचे लोक पोलिसांना घेऊन तिथे पोहोचले आणि तरूणीला ताब्यात घेतलं.
जेव्हा पोलिसांनी तरूणीला विचारपूस केली आणि तरूणीने जे सांगितले ते ऐकून सगळे अवाक् झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूणीने सांगितले की, तिला तिच्या प्रियकरासोबत लग्न करायचं आहे. पण तिच्या घरातील लोक यासाठी तयार नाही. या कारणानेच त्यांनी तिला नातेवाईकाकडे मितली गावात पाठवलं आहे.
तरूणीने सांगितले की, तिला प्रियकरासोबत लग्न करायचं. त्यामुळेच तिने हा खोटा आरोप लावला आणि व्हिडीओ व्हायरल केला. पोलीस आता पुढील चौकशी आणि कारवाई करत आहेत.