Bahubali Samosa: सोशल मीडियावर जेवण आणि स्नॅक्सचे अतिशय मनोरंजक व्हिडिओ दिवसेंदिवस व्हायरल होत आहेत. काही वेळा स्ट्रीट फूडचेबी अजब व्हिडीओ समोर येत असतात. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका खाद्य विक्रेत्याने एवढा मोठा समोसा बनवला की लोक आश्चर्यचकित झाले आहेत. हा समोसा, त्याचे वजन आणि त्याची किंमत थक्क करणारी आहे. एवढेच नाही तर तो समोसा संपूर्ण खाल्ला तर खाणाऱ्याला बक्षीसदेखील जाहीर करण्यात आले आहे.
कुठे मिळतो हा समोसा? समोसाच्या आत काय-काय?
बाहुबली समोसाचा हा व्हिडिओ मेरठमधील आहे. प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका यांनी त्यांच्या हँडलवर ट्विट केला आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ येथील एका मिठाईच्या दुकानात हा समोसा बनवला जातो. हे दुकान शुभम नावाचा व्यक्ती चालवतो. इथे हा 'बाहुबली समोसा' मिळतो. त्याचे वजन तब्बल आठ किलो आहे. या समोसामध्ये भरपूर बटाटे आणि चीज असं स्टफिंग आहे.
समोसा पूर्ण खाल्ला तर ५१ हजारांचे बक्षिस
८ किलो वजनाच्या या समोसाची किंमत १,१०० रुपये इतकी आहे. हा समोसा पूर्ण खाल्ल्यास खाणाऱ्याला ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीसही मिळेल, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. फूड ब्लॉगर चाहत आनंदनेही हा समोसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. समोसाच्या या व्हिडिओने इंटरनेटवर चांगलीच वाहवा मिळवल्याचे दिसतेय. बिझनेस मॅन हर्ष गोयंका यांनी एक मजेदार कॅप्शन शेअर करत व्हिडीओ पोस्ट केला आहे की, या दिवाळीनंतर, माझ्या पत्नीने मला बजावले आहे की दिवसातून फक्त एकच समोसा खायचा. त्यामुळे मी माझ्यासाठी हा एक समोसा ऑर्डर केला आहे.
तुम्हीही जर समोसा प्रेमी असाल तर हा समोसा तुमच्यासाठी आहे. एकावेळी किती समोसे खाऊ शकतात, याचे उत्तर हा समोसा खाल्ल्यावर मिळू शकते. त्यासाठी ५१ हजार रुपयांची मोठी रक्कमही देण्यात येणार आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.