लग्जरी ब्रांड आणि फॅशन कंपनी बलेनसियागाने (Balenciaga) असा बूट तयार केला आहे, ज्यावरून नेटिझन्स सोशल मीडियावर कंपनीला मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. दरम्यान, कंपनीने 'पेरिस स्नीकर' कलेक्शन जारी केले आहे. खरंतर 'पेरिस स्नीकर' कलेक्शनमध्ये ज्या बुटांचा समावेश करण्यात आला आहे, ते खूप घासलेले आणि फाटलेले दिसून येत आहेत.
कंपनीने घासल्यासारखे आणि फाटल्यासारखे दिसणाऱ्या बुटांचे १०० जोड लिमिटेड एडिशन कलेक्शनमध्ये जारी केले आहे. या बुटांची किंमत 48,279 रुपये (625 अमेरिकी डॉलर) इतकी आहे. दरम्यान, हे बूट पाहून नेटिझन्सनी लिहिले आहे की, 'एकदा पाहिले तर ते कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले आहे, असे वाटते.'
बलेनसियागाने (Balenciaga) बूट बनवण्यामागील उद्देश सांगितला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या बुटांची क्लासिक डिझाइन आहे, जी मध्यकालीन एथलेटिक्सला दर्शविते. हे बूट काळ्या, पांढऱ्या आणि लाल रंगात आहेत. बुटाला सोल आणि पुढील भागात पांढऱ्या रंगाचा रबर आहे. या बुटांना पाहिले तर असे वाटते की, पहिल्यांदाच कोणीतरी हे बूट घातले आहेत.
या बुटांची ऑनलाइन विक्री सुरु होताच सोशल मीडियात नेटिझन्सनी कंपनीला ट्रोल करण्यास सुरूवात केली. अनेक युजर्सनी म्हटले की, बलेनसियागाने हे बूट घेऊन आगीत फेकून दिले आहे. दरम्यान, कंपनीने सध्या हे बूट युरोपियन मार्केटमध्ये आणले आहेत. तर मिडिल ईस्ट आणि अमेरिकेतील स्टोअरमध्ये हे बूट १६ मेपासून उपलब्ध होतील. याचबरोबर, जपानमध्ये या बुटांची विक्री २३ मेपासून होणार आहे. तसेच, ऑनलाइन इंटरनॅशनल स्टोअरमधून जगभरातील लोक हे बूट खरेदी करू शकतात.