लेक म्हणजे वडिलांची लाडकी असते. ती मोठी झाली की वडिलांना सर्वात जास्त चिंता असते ती तिच्या लग्नाची. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, असा एक समाज आहे, जिथं वडील आपल्या मुलीच्या लग्नाची चिंता करण्याऐवजी स्वतःच तिच्यासोबत लग्न करतात. ज्या मुलीला लहानपणापासून आपल्या अंगाखांद्यावर खेळवलं ती मुलगी तरुण होताच वडीलच तिच्यासोबत संसार थाटतात. एका समाजातील ही विचित्र प्रथा आजही सुरू आहे (Father marry daughter).
बांग्लादेशातील मंडी समाजातील ही प्रथा. जिथं वडील आपल्या मुलीसोबत लग्नगाठ बांधतात. जेव्हा कोणताही पुरुष एखाद्या विधवा महिलेशी लग्न करतो तेव्हा तो तिच्या मुलीशीही लग्न करतो. एखादी मुलगी ज्याला बाबा म्हणून हाक मारते तोच भविष्यात तिचा नवरा होतो.
या समाजातील तरुणी ओरोलाने या प्रथेबाबत बरचे शॉकिंग खुलासे केले आहेत. तिने सांगितलं जेव्हा ती छोटी होती, तेव्हा तिने आपल्या वडिलांना गमावलं. तिच्या आईने दुसरं लग्न केलं. ओरोलाला आपले दुसरे म्हणजे सावत्र वडील खूप आवडले. ते तिची खूप काळजी घ्यायचे. पण जेव्हा ती तरुण झाली तेव्हा तिला अशी गोष्ट समजली, ज्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकली. जेव्हा ती तीन वर्षांची होती तेव्हाच तिचं लग्न तिच्या या सावत्र वडिलांशी लावण्यात आलं होतं, हे तिला समजलं. ज्याला ती वडील म्हणत होती, तो तिचा नवरा होता.
ही विचित्र प्रथा बऱ्याच वर्षांपासून चालत आली आहे. पुरुष आपल्या स्वतःच्या मुलीसोबत असं करत नाही तर सावत्र मुलीसोबत तो असं करतो. म्हणजे एखादी मुलगी तिच्या सावत्र वडिलांची भविष्यात बायको बनते. या मुलीच्या आईने दुसरं लग्न केलेलं असतं. म्हणजे जेव्हा कोणतीही महिला विधवा होते. तेव्हा तिला पहिल्या लग्नापासून झालेल्या तिच्या मुलीचं लग्न त्याच्याशी लावलं जाईल याच अटीवर दुसरा पुरुष तिच्याशी दुसरं लग्न करायला होतो.
कमी वय असेलला नवरा आपली पत्नी आणि मुलगी दोघींचंही एकाच वेळी रक्षण करू शकेल, असं लॉजिक यामागे लावलं जातं. पण यामुळे या समाजातील कित्येक मुलींचं आयुष्य नरक बनलं आहे