आजकाल लोक काळानुसार आपल्या वागण्यात आणि मान्यतांमध्ये बदल करत आहे. काही जुन्या रूढींमुळे जगाच्या मागे राहण्याचा धोका अधिक असतो. अशात लोक शिक्षण घेऊन पुढे जात आहे. पण आजही जगात अशा काही कुप्रथा आहेत ज्यांचं पालन केलं जातं. जे यांचं पालन करतात त्यांच्यानुसार, या कुप्रथांमुळे त्यांची ओळख आहे. भलेही त्यांना यासाठी रक्ताच्या नात्यांना काळिमा का फासावी लागे ना.
कुप्रथांबाबत सांगायचं तर यात बांग्लादेशातील एका समुदायाचा उल्लेख नक्की होतो. या समुदायात बाप-लेकीच्या नात्याला कलंकित केलं जातं. ज्या वडिलाच्या कुशीत मुलीला सगळ्या समस्यांपासून सुरक्षा मिळते. त्याच वडिलांना मुली इथे घाबरतात. यामागचं कारणही फार धक्कादायक आहे. बांग्लादेशातील या समुदायात मुलगी तरूण झाली की, तिचा पिताच तिचा पती बनतो.
वडिलच बनतो पिता
बांग्लादेशमध्ये मंडी जमातीत हे आजही होतं. या जमातीमध्ये ही अजब प्रथा फार आधीपासून चालत आली आहे. इथे जर एखादी महिला कमी वयात विधवा होते तेव्हा तिचं दुसरं लग्न लावून दिलं जातं. या लग्नात पुरूष तिला पत्नीचे सगळे अधिकार देतो. तिचा सांभाळ करतो. पण जर महिलेला पहिल्या लग्नातून मुलगी झाली असेल तर ती मुलगी तरूण झाल्यावर तो तिच्यासोबतही निकाह करतो. याच अटीवर पुरूष विधवेसोबत लग्न करणयास तयार होतात. म्हणजे बालपणी ज्या व्यक्तीला मुलगी बाबा म्हणते तरूण झाल्यावर त्याच्यासोबतच तिला लग्न करावं लागतं.
मंडी जमातीमधील लोक लोक ही कुप्रथा फार पूर्वीपासून मानत आले आहेत. त्यांचा तर्क आहे की, या रिवाजातून ते दोन महिलांचं जीवन सुरक्षित आणि चांगलं करतात. आधी विधवा आईचं मग तिच्या मुलीचं. पण या अजब रिवाजामुळे आजपर्यंत अनेक मुलींचं जीवन उद्ध्वस्त झालं आहे.
मंडी जमातीतील ओरोला नावाच्या एका मुलीने या कुप्रथेबाबत खुलासा केला होता. तिने सांगितलं की, जेव्हा ती खूप लहान होती तेव्हा तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. तेव्हा तिच्या आईने एका दुसऱ्या पुरूषांसोबत लग्न केलं होतं. ओरोलाने वडील समजून तिला परवागनी दिली. पण जेव्हा ती तरूण झाली तेव्हा याच सावत्र वडिलाने तिच्यासोबत लग्न करून तिच्यावर रेप केला.