आतापर्यंत तुम्ही माणसाला मृत्युदंडाची शिक्षा झाल्याचं ऐकलं असेल, पण कधी तुम्ही एखाद्या अस्वलाला मृत्युदंडाची शिक्षा झाल्याचं ऐकलं का? नाही ना? पण आता अशीच एक घटना समोर आली आहे. सीएनएनने दिलेल्या एका वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात ट्रेंटिनोच्या उत्तर क्षेत्रात एक वडील आणि मुलगा हायकिंगसाठी गेले होते. तेव्हा त्यांच्यावर अस्वलाने जीवघेणा हल्ला केला होता. याच गुन्ह्याखाली अधिकाऱ्यांनी अस्वलाला चक्क मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. 59 वर्षीय फेबिओ मिस्सरोनी त्यांचा 28 वर्षीय मुलगा क्रिश्चियनसोबत माउंट पेलरच्या रस्त्याने जात होते. तेव्हा अचानक रस्त्यात अस्वल आलं आणि त्याने त्यांच्यावर हल्ला केला.
क्रिश्चियनने सीएनएनला सांगितले की, 'अस्वलाने त्याचा पाय धरला तोंडात धरला होता. मला सोडवण्यासाठी वडिलांनी अस्वलाच्या पाठीवर उडी घेतली. मी तर अस्वलाच्या तावडीतून सुटलो, पण अस्वलाने त्यांच्या पायाचा तीन जागी लचका तोडला. नंतर मी अस्वलाचं लक्ष भटकवण्यासाठी टाळ्या वाजवल्या. तेव्हा अस्वल जंगलाकडे पळून गेलं'.
या हल्ल्यानंतर ट्रेटिनो गव्हर्नर Maurizio Fugatti यांनी अस्वलाला पकडण्यासाठी आणि मारण्यासाठी आदेशांवर सही केली. फिरायला गेलेल्या वडील-मुलाच्या जखमेतून मिळालेल्या लाळेतून आणि कपड्यांवर मिळालेल्या डीएनएच्या माध्यमातून अस्वलाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अनेक संस्थांनी या निर्णयावर टीका केली आहे. इटलीच्या वर्ल्ड वाइल्डलाईफ फंड ब्रॅंचने एक ऑनलाइन पीटिशन सुरू केली आहे. जी 22 हजार लोकांनी साइन केलीये. तसेच इटलीचे पर्यावरण मंत्री या आदेशा विरोधात आहेत. ते म्हणाले की, 'होऊ शकतं की, मादा आपल्या पिल्लांचा बचाव करत असेल'.
दरम्यान, गेल्या महिन्यात एका 12 वर्षीय मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. उत्तर इटलीमध्ये एका मुलाचा सामना एका ब्राउन अस्वलासोबत झाला होता.
खोदकाम करताना मजूराला सापडला खजिना, मडक्यात जे दिसलं ते पाहून लोक झाले अवाक्...