रोमानिया (Romania) ची एक माजी मॉडलने एका कंपनीवर खळबळजनक आरोप केला आहे. अनेक ब्युटी कॉन्टेस्टमध्ये किताब जिंकणाऱ्या या मॉडलचं नाव क्लॉडिया एडिलिन (Claudia Ardelean) आहे. २७ वर्षीय या मॉडलने दावा केला की, तिला नोकरीहून काढण्यात आलं कारण ती जास्त सुंदर आहे.
काही दिवसांपूर्वी तिला एका हॉस्पिटलमध्ये जॉब ऑफर मिळाली होती. रोमानियाच्या न्यूज पोर्टल्सनुसार, २७ वर्षीय ब्युटी क्वीन क्लॉडियाला रोमानियातील न्यूमोफिथिसियोलॉजी क्लीनिकल हॉस्पिटलच्या बोर्डमध्ये आठवड्याभरापूर्वी बिनपगारी पदावर नियुक्त करण्यात आलं होतं. (हे पण वाचा : खऱ्या प्रेमाच्या शोधात अनोखा प्रयोग, इतके महिने साखळीने बांधून एकत्र राहणार हे कपल....)
रोमानियाच्या प्रसिद्ध (Romanian Pneumonia Clinical Hospital) हॉस्पिटलमध्ये नोकरी केलेली क्लॉडिया उच्चशिक्षित आहे. क्लॉडियाने कायदा आणि यूरोपियन एथिक्स या दोन विषयातून ग्रॅज्युएशन केलंय. क्लॉडियानुसार नोकरी सोडायला भाग पाडण्याआधी तिला हॉस्पिटलच्या बोर्डात बिनपगारी काम करण्यास सांगण्यात आलं होतं. नोकरी सोडल्यानंतर तिने सोशल मीडियावर नोकरी सोडण्यामागच्या कारणाचा खुलासा केला. सोबतच तिने तिच्या प्रवासाच्या काही आठवणीची सांगितल्या. (हे पण वाचा : Sperm Donor वडिलांनी ५०० वेळा विकले स्पर्म, सावत्र बहीण-भावांमुळे तरूणाचे डेटींगचे वांदे...)
क्लॉडियाने ८ फेब्रुवारीला आपला यशस्वी प्रवासाबाबत सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून सांगितला होता. तिने या पोस्टमध्ये लिहिले होते की, 'मी बोर्डाच्या विश्वासासाठी आणि समर्थनासाठी आभारी आहे'. यादरम्यान अचानक तिला राजीनामा मागण्यात आला. यादरम्यान अनेक लोकांनी दावा केला होता की, क्लॉडियाला नोकरी केवळ तिच्या लूकमुळे मिळाली होती.
भरपूर टीका झाल्यानंतर पोस्ट हटवण्यात आली. तिने स्थानिक वृत्तपत्राला सांगितले की, ती तिची नियुक्ती झाल्यावर बोर्डाने घेतलेल्या यू-टर्नला बघून हैराण झाली होती. सोबतच सोशल मीडियावरून तिला ट्रोल करण्यात आल्यानेही ती निराश झाली.